दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. विशेषतः विकेंडला शहराबाहेर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.