IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला… – Marathi News | IND vs ZIM t20 1st match Team India won the toss and elected to bowl first know about the playing XI what Shreyas Iyer said


IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…Image Credit source: BCCI Twitter

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय तिसऱ्या टी20 मालिकेसाठी सज्ज आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून टीम इंडिया श्रेयसच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. श्रेयस अय्यरने नेतृत्व स्वीकारल्यापासून एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेत तरी पहिला विजय मिळवणार का? याकडे लागून आहे. कारण आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने आधीच 0-2 ने मात दिली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढणं सहाजिकच आहे. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे धक्का बसला आहे. सामन्याच्या काही तासांआधी फलंदाज मिल्टन शुंबा या मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी इनोसेंट काइया याला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णंधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, त्यामुळे खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही. पण सराव खेळपट्ट्या आणि मैदानावरील सराव खेळपट्ट्या पाहता, तिथे चांगला बाऊन्स मिळत होता. त्यामुळे निश्चितच, हा एक महत्त्वाचा पैलू आहे. खेळपट्टी कशी असेल हे मला माहीत नाही, पण तसा अंदाज आहे. श्रेयस अय्यर झिम्बाब्वेबाबत म्हणाला की, ते गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः विश्वचषकात, ज्याप्रकारे खेळले, ते अप्रतिम होते. ते डोळ्यांना सुखद वाटत होते. फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करत होते. ते अद्भुत होते. प्लेइंग 11 बाबत श्रेयस अय्यरने सांगितलं की, आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन करन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *