IND vs SA : तापाने फणफणलेली तरी ती मैदानात उतरली, टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणला, कोण आहे क्रिकेटर? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने हा 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला होता. साऊथ आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार मेरीजन कॅप ठरली आहे

News18
News18

India W vs South Africa W : वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये आज साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेट राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने हा 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला होता. साऊथ आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार मेरीजन कॅप ठरली आहे कारण तिने 81 धावांची नाबाद खेळी करून हा सामना जिंकवला.

पहिल्यांदा सामन्याबद्दल जाणून घेऊयात. टीम इंडियाने दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण साऊथ आफ्रिकेची कॅप्टन लॉरो वोल्हार्ट 20 धावांवर बाद झाली. तिच्या पाठोपाठ आनेरी डर्कसन शुन्यावर बाद झाली होती.या दोन्ही विकेट श्री चरणीने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या आहेत. त्यामुळे इथून टीम इंडिया सहज मॅच जिंकेल असे वाटत होते.

पण मेरीजन कॉपने एकाबाजूने साऊथ आफ्रिकेचा डाव सावरला होता.या दरम्यान श्री चरणीने पुन्हा एकदा नंदीनी डी क्लर्ककला 5 धावा करून बाद केले होते. यानंतर मेरीजन कापने शेवटपर्यंत मैदानात टीकून 81 धावांची नाबाद खेळी केली.तिच्यासोबत क्लो ट्रायन 10 वर नाबाद राहिली होती.अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेने हे लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला.

आता या सामन्याआधी मेरीजन कॅप ही आजारी होती. ती तापाने फणफणलेली तरी मैदानात उतरली आणि तिने साऊथ आफ्रिकेला हा सामना जिंकून दिला. साऊथ आफ्रिकेच्या विजयानंतर कर्णधार लॉरो वोल्हार्टने ही गोष्ट सगळ्यांसमोर आणली आहे. मॅच नंतर बोलताना लॉरो वोल्हार्ट म्हणाली, डगआउटमध्ये बसून आम्ही खूप तणावाखाली होतो. इतक्या प्रचंड दबावाखाली मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक होती. मोठ्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू म्हणून ती कदाचित आजवरची सर्वोत्तम खेळाडू असावी. ती माझ्या संघात आहे याचा मला खूप आनंद आहे. आज तिची प्रकृती फारशी बरी नव्हती. जर ती अशीच कामगिरी करणार असेल, तर तिची प्रकृती रोज अशीच (थोडी अस्वस्थ) राहावी अशी मी आशा करेन!,अशा गमतीशीरपणे लॉरो मेरीजन कॅपवर म्हणाली आहे.

मला वाटतं तिच्याकडे एक उपजत स्पर्धात्मक वृत्ती आहे आणि त्यामुळेच तिची सर्वोत्तम कामगिरी बाहेर येते. सुरुवातीला आम्हाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. धावगती (रन-रेट) सुरुवातीलाच वाढवता आली असती तर बरं झालं असतं. डावाच्या उत्तरार्धात खूप काही करायचं बाकी होतं. ते साध्य करण्यासाठी एका विशेष कामगिरीची गरज होती आणि तिने ती करून दाखवली; ती कामगिरी खरोखरच मोलाची ठरली,असे देखील लॉरो म्हणाली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

IND vs SA : तापाने फणफणलेली तरी ती मैदानात उतरली, टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणला, कोण आहे क्रिकेटर?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *