Last Updated:
भारताच्या विजयाच संपूर्ण क्रेडिट दिप्ती शर्माला जातं कारण तीने या सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. पण दिप्तीने या विजयाच श्रेय ज्यांना दिलं त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदीशी देखील काही कनेक्शन आहे.
India vs Pakistan : आयसीसी वुमेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप मोहिमेची दणक्यात सूरूवात केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 106 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे भारताने हा सामना 64 धावांनी जिंकला होता. या विजयाच संपूर्ण क्रेडिट दिप्ती शर्माला जातं कारण तीने या सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. पण दिप्तीने या विजयाच श्रेय ज्यांना दिलं त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदीशी देखील काही कनेक्शन आहे. दरम्यान दिप्तीने नेमकं हे श्रेय कुणाला दिलं हे जाणून घेऊयात.
खरं तर पहिल्यांदा सामन्याबद्दल जाणून घेऊयात. भारताने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली होती. पण नंतर गुल फेरोजा 12 वर बाद झाली तिच्यापाठोपाठ आयेशा जफरही 12 वर आऊट झाली. या दोनही विकेट दिप्ती शर्माने घेतल्या होत्या.त्यानंतर श्री चरणीने सायरा जाबीनला 2 धावांवर बाद केले होते.एकाबाजूने पाकिस्तानचे विकेट पडत असताना मुनीबा अलीने एका बाजूने डाव सावरला होता.
त्यानंतर श्री चरणीच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला सायरा जबीने बॅटीला बॉल लागून विकेटमागे गेला होता.याचवेळी मागे उभ्या असलेस्या दिप्ती शर्माने वायुवेगाने स्टम्पवर हिट करत सायरा जबीनला रनआऊट केले होते.सायरा जबीनचा हा रनआऊटच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. कारण टॉप ऑर्डरमध्ये तिने एकटीच 41 धावा केल्या होत्या.त्यामुळे ही विकेट टर्निंग पॉईंट होती. सायरा जबीन आऊट होताच विकेटची लाईन लागली. नतालीया परवेज 7, फातिम सना शुन्यावर, रमीन शमीम 4 धावांवर बाद झाली .श्रेयांका पाटीलने तिची उत्कृष्ट कॅच घेतली.त्यानंतर पुन्हा शेवटी दिप्ती शर्माने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून नाश्रा संधुला 4 वर तस्मिया रुबाबला शुन्यावर बाद केले.अशाप्रकारे भारताने पाकिस्तानला 106 वर ऑल आऊट केले.
भारताच्या या विजयाची खरी हिरो ही दिप्ती शर्मा ठरली. कारण तिने 4 ओव्हरमध्ये 10 देऊन 5 विकेट घेतल्या. दिप्ती शर्माने या विजयाच श्रेय हनुमान जींना दिलं. दिप्ती शर्माच्या हातावर हनुमानजीचा टॅटू देखील आहे. मागे नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस भारताने वर्ल्डकप जिंकलेला तेव्हा टीम इंडिया पंतप्रधान मोदी यांना भेटली होती.त्यावेळी दिप्तीने तिच्या हातावरील हा टॅटू पंतप्रधान मोदी यांना दाखवला होता.
दरम्यान सामन्यानंतर बोलताना दिप्ती शर्मा म्हणाली, मी खूप आभारी आहे. मला अशा प्रकारच्या खेळपट्ट्या (आवडतात; याचे सर्व श्रेय संघाला जाते आणि हनुमानजी यांना जाते,असे दिप्ती म्हणाली.
खेळपट्टी फिरकीला अनुकूल (turning) असल्याने, मी प्रत्येक चेंडूवर आणि प्रत्येक षटकात गोलंदाजीचा वेग बदलत राहिले. त्याचा मला खूप फायदा झाला. हो, चेंडू वळत असल्याने, हवेत थोडा संथ चेंडू टाकणे आणि स्वतःवर विश्वास ठेवून योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे, या गोष्टींवर मी भर दिला,असे दिप्ती शर्मा तिच्या गोलंदाजीबाबत सांगते.
Mumbai,Maharashtra
Jun 14, 2026 11:23 PM IST
IND vs PAK : PM मोदींनी विचारलेल्या टॅटूला दिले विजयाचे क्रेडीट, पाकिस्तान विरुद्ध धुरंधर ठरली दिप्ती, काय आहे पाच विकेटचे सिक्रेट
