टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही टीम इंडियाने कर्णधार बदलला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर आयर्लंडनेही त्यांचा टी-20 टीमचा कर्णधार बदलला आहे. लॉर्कन टकर आयर्लंडचा कर्णधार असेल, याआधी तो टीमचा उपकर्णधार होता.
भारत-आयर्लंड सीरिजचं वेळापत्रक
भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी-20 सीरिजला 26 जूनपासून सुरूवात होणार आहे. यानंतर 28 जूनला दुसरी टी-20 मॅच खेळवली जाईल. दोन्ही टी-20 सामने बेलफास्टमध्ये होणार आहेत. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या दोन्ही मॅच भारतीय वेळेनुसार एक तास आधीच सुरू होतील. भारतामध्ये टी-20 सामने संध्याकाळी 7 वाजता तर आयपीएलचे सामने साडेसात वाजता सुरू होतात, पण आयर्लंडमधल्या दोन्ही टी-20 मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होतील. मॅचचा टॉस संध्याकाळी 5.30 वाजता होईल.
भारताचं आयर्लंडविरुद्धचं रेकॉर्ड
आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाचं विजयाचं रेकॉर्ड 100 टक्के आहे. या दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 8 टी-20 सामने झाले आहेत, यातले 6 सामने आयर्लंडमध्ये तर एक इंग्लंडमध्ये आणि एक युएसएमध्ये झाला आहे. यातल्या सर्व 8 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.
भारताची टी-20 टीम
श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
आयर्लंडची टी-20 टीम
लॉर्कन टकर (कर्णधार), रॉस एडेयर, बेन काल्टिज, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहनी, मॅथ्यू हंप्रीज, गेव्हिन हॉय, मॅथ्यू होलार्ड, लियम मेकार्थी, जय मुंद्रा, हॅरी टॅक्टर, टिम टॅक्टर, रियुबेन विल्सन