लग्नाचे आमिष दाखवलं, नंतर लैंगिक संबंध ठेवून…स्टार खेळाडूविरोधात पोलीसात तक्रार, नेमकं प्रकरण काय? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

स्टार खेळाडूविरोधात एका महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, तसेच मारहाण आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचे आरोप केले आहेत.

abhishek porel
abhishek porel

ABhishek Porel : क्रिकेट वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार खेळाडूविरोधात एका महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, तसेच मारहाण आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.

बंगाल आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याच्या विरोधात एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, तसेच मारहाण आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे असे आरोप या महिलेने केले आहेत. पण अभिषेक पोरलने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

मंगळवारी हुगळी जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात संबंधित महिला आणि तिच्या आईने ही तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीनुसार, ती महिला आणि पोरेल गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.मात्र, गेल्या वर्षी त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर या क्रिकेटपटूने तिच्यापासून “दुरावा” राखण्यास सुरुवात केली, असा आरोप महिलेने केला आहे.तसेच, पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु आता तो तसे करण्यास तयार नाही, असा आरोपही तिने केला आहे.

पोरेलने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले; याशिवाय तिने त्याच्यावर मारहाण आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सांगितले.”आम्हाला तक्रार प्राप्त झाली असून आम्ही तपास सुरू केला आहे,” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

सध्या बेंगळुरूमध्ये असलेल्या पोरेलने हे आरोप फेटाळून लावले असून ते खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच, पोलिसांकडून अद्याप आपल्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, असेही त्याने सांगितले.”मी सध्या चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे अशा विविध गोष्टी समोर येत आहेत,” असे पोरेलने माध्यमांशी बोलताना सांगितले.

डावखुरा आणि वरच्या फळीतील फलंदाज असलेला पोरेल २०२३ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी चार डावांत १०८ धावा केल्या होत्या.त्याने २०२१-२२ च्या हंगामात बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ३२ प्रथम श्रेणी व २३ ‘लिस्ट ए’ (List A) सामने खेळले आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

लग्नाचे आमिष दाखवलं, नंतर लैंगिक संबंध ठेवून…स्टार खेळाडूविरोधात पोलीसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *