IND vs ENG : व्हाईस कॅप्टन्सी काढली, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन… हरलेल्या सामन्यात एकटा लढला मॅच विनर! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. भारताने दिलेलं 191 रनचं आव्हान इंग्लंडने 19 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं.

व्हाईस कॅप्टन्सी काढली, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन... हरलेल्या सामन्यात एकटा लढला मॅच विनर!
व्हाईस कॅप्टन्सी काढली, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन… हरलेल्या सामन्यात एकटा लढला मॅच विनर!

मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. भारताने दिलेलं 191 रनचं आव्हान इंग्लंडने 19 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. जेकब बेथलने 46 बॉलमध्ये 76 रनची नाबाद खेळी केली. तर कर्णधार हॅरी ब्रुकने 15 बॉल 39 आणि टॉम बॅन्टनने 32 बॉल 39 रन केले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या याशिवाय हर्षित राणा, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना 1-1 विकेट मिळाली.

अर्शदीप सिंगने सर्वाधिक विकेट घेतल्या असल्या तरी त्याची आणि रवी बिष्णोईची एक-एक ओव्हर टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. अर्शदीपने त्याच्या एका ओव्हरमध्ये 27 आणि रवी बिष्णोईने त्याच्या ओव्हरमध्ये 29 अशा एकूण 56 रन दिल्या आणि सामना टीम इंडियाच्या हातातून निसटला.

अक्षर पटेल एकटा लढला

टीम इंडियाच्या इतर बॉलर्सवर इंग्लंडचे खेळाडू आक्रमण करत असताना अक्षर पटेल मात्र या सामन्यात एकटाच लढला. 4 ओव्हरमध्ये अक्षर पटेलने फक्त 20 रन देऊन एक विकेट घेतली. टीम इंडियाने लागोपाठ 2 वर्ल्ड कप जिंकले त्यातल्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये आणि 2026 च्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये अक्षर पटेल टीम इंडियाचा मॅच विनर होता. तसंच अक्षरला काही काळ टीमचं व्हाईस कॅप्टनही करण्यात आलं, पण अचानक अक्षरची व्हाईस कॅप्टन्सी काढून घेतली गेली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलचं बॅटिंगमध्येही डिमोशन केलं गेलं. अक्षर पटेलच्या आधी टीमने हर्षित राणाला बॅटिंगसाठी पाठवलं होतं, पण दुसऱ्या टी-20 सामन्यात अक्षरने त्याच्या बॉलिंगने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे.

बॅटिंगमध्ये टीम इंडियाचा संघर्ष

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 190 रनचा स्कोअर केला. इशान किशनने 49, अभिषेक शर्माने 43 आणि श्रेयस अय्यरने 37 रन केले. पॉवरप्लेमध्येच टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 65 रन केले, यानंतर टीमचा स्कोअर 200 च्या पार जाईल, असं वाटत होतं पण टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरला चांगल्या सुरूवातीनंतर मोठा स्कोअर करता आला नाही, तसंच फिनिशरही अपयशी ठरले. शिवम दुबेने 7 बॉलमध्ये 5 आणि तिलक वर्माने 11 बॉलमध्ये नाबाद 24 रन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *