Last Updated:
लॉर्डसच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळवल्या गेलेल्या टेस्टमध्ये टीम इंडिया फक्त 4 विकेट दूर आहे. त्यामुळे उद्या टीम इंडियाचा महिला संघ लॉर्डसच्या मैदानावर इतिहास रचणार आहे.
England Women vs India Women Lord Test : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर टीम इंडियाचा महिला संघ ऐतिहासित विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.कारण लॉर्डसच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळवल्या गेलेल्या टेस्टमध्ये टीम इंडिया फक्त 4 विकेट दूर आहे. त्यामुळे उद्या टीम इंडियाचा महिला संघ लॉर्डसच्या मैदानावर इतिहास रचणार आहे.
टीम इंडियाने त्यांचा दुसरा डाव 341 धावांवर घोषित केला होता.त्यात पहिल्या डावातील 116 धावांच्या आघाडीमुळे टीम इंडियाने इंग्लंडसमोर 457 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात खूपच खराब झाली. कारण क्रांती गौडने तिच्याच पहिल्याच ओव्हरला टॅमी बिओमांटला क्लिन बोल्ड केले होते. त्यानंतर सायली सातघरे माइया बाऊचरला अवघ्या 2 धावांवर बाद केले होते.अशाप्रकारे इंग्लंडच्या 6 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या.
त्यानंतर कॅप्टन नॅट सिव्हर ब्रंट आणि हेथर नाईट ही नवीन जोडी मैदानात आली होती. यावेळी स्नेहा राणाने नॅट सिव्हर ब्रंटला 11 धावांवर क्लिन बोल्ड केले होते. त्यानंतर क्रांती गौडने हेदर नाईटला 13 धावांवर बाद केले. त्यानंतर सायली सातघरेने अॅलीस कॅप्सीला 21 वर बाद केले होते. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 59 वर 5 विकेट अशी झाली होती.
अॅमी जोनस आणि मॅडी विलियर्स यांनी 67 धावांचा पार्टनरशीप करून इंग्लंडचा डाव सावरला होता. पण यावेळी स्नेहा राणाने मॅडी विलियर्सला 26 वर बाद केले. त्यानंतर सोफी मैदानात आली होती. तिने एक धाव केली आहे, तर अॅमी जोनस 52 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडच्या धावा तिसऱ्या दिवसअखेर 6 विकेट गमावून 130 झाल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडा विजयासाठी अजून 327 धावा करायच्या आहेत. तर टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 4 विकेटची गरज आहेत. त्यामुळे उद्या जर टीम इंडियाने 4 विकेट काढले तर लॉर्डसवर टीम इंडिया इतिहास रचणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
टीम इंडियाकडून सायसी सातघरे,क्रांती गौड आणि स्नेह राणाने प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या.
Mumbai,Maharashtra
Jul 12, 2026 11:24 PM IST
IND vs ENG : लॉर्डसवर 24 तासात थरार, टीम इंडिया ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर,वुमेन्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार
