Home Cleaning : घरात झाडू – लादी करायला वेळ नाही? आता रोबोटच करणार सगळी सफाई, किंमत ऐकून म्हणाल ‘हे काम तर बाईपेक्षा भारी’ – Marathi News | Robot vacuum cleaner for home automatic floor cleaning vacuum and mopping robot with smart mapping wifi app control and self charging features for busy families and working people


ऑफिस, मुलांसोबत वेळ घालवणं, घरची काम आणि त्यात रोजचा झाडू आणि लादी पुसण्याचा त्रास… हे सगळं करता करता कंबरडं पार मोडून जात. दिवस संपतो पण घरकाम काही संपण्याच नाव घेत नाही. सकाळी घर साफ केलं तरी संध्याकाळी पुन्हा धूळ, त्यात लहान बाळ घरी असेल तर तारेवरची कसरतचं. केस आणि कचरा कायम लादीला चिपकलेले. पण आता लादी पुसण्याला आणि झाडूला आराम करू देण्याची वेळ आली आहे. बाजारात एक नवं Robot Vaccum Cleaner आलंय.ज्यामुळ तुमचं काम चुटकीसरशी होणार आहे.

रोबोट घरात फिरतो आणि सफाई करून जातो

Robot Vacuum Cleaner मध्ये नेव्हिगेशन सिस्टिम आणि मॅपिंग फिचर आहे. त्याच्या आधारे हा रोबोट आधी घराचा नकाशा तयार करतो आणि त्यानुसार घरभर फिरून सफाई करतो. खाली असलेल्या ब्रश आणि रोलरच्या मदतीने धूळ, कचरा आणि केस गोळा करून डस्टबिनमध्ये जमा केले जातात. काही मॉडेल्समध्ये मॅपिंगची सुविधाही असते, त्यामुळे झाडूसोबत लादी पुसण्याचं कामही केलं जातं.

तुम्ही ऑफिसला पण रोबोट करणार काम

याची गंमत म्हणजे हा रोबोट चालण्यासाठी सतत मागे उभं राहण्याची गरज नाही. काही मॉडेल्स मोबाईल अॅप आणि Wi- Fi च्या मदतीने कंट्रोल करता येतात. घरात नेमका कोणता भाग साफ करायचा. हेही ठरवता येतं. बॅटरी कमी झाली की काही मॉडेल्स स्वत:हून चार्जिंग स्टेशनमध्ये जातात. या रोबोटची रचना साधारणपणे पातळ असल्यामुळे तो बेड,सोफा आणि फर्निचरच्या खालीही जाऊ शकतो. या रोबटची रचना साधारणपणे पातळ असल्यामुळे तो बेड, सोफ आणि खालीही जाऊ शकतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी झाडू पोहोचताना अक्षरक्ष कसरत करतो,तिथे हा छोटा रोबोट आरामात फिरू शकतो.

किंमत किती

Robot Vaccum Cleaner म्हटलं की लगेच खूप महाग असेल असं वाटतं. पण बाजारात वेगवेगळ्या बजेटमधले पर्याय उपलब्ध आहेत.साधारण या मॉडेल्सची सुरूवात ४००० ते १५००० पासून होते. तर अधिक स्मार्ट फिचर्स असलेले मॉडेल्स २०,००० ते ४०,००० च्या आसपास मिळू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *