Hanuman Ansh Actor Fee: सध्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची एकच चर्चा आहे. केवळ दोन कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचची कथा लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटात नीम करौली बाबांच्या आयुष्यातील बालपणापासून ते महान संत बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेते शोभिनव सत्या यांनी ‘नीम करौली बाबा’ यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळालं? तसेच कोणतंही ऑडिशन न देता त्यांची या भूमिकेसाठी निवड कशी झाली? जाणून घेऊया हा रंजक किस्सा..
निम करोली बाबांची भूमिका अन् मिळाली एवढी फी…
‘हनुमान अंश’मुळे घराघरात पोहोचलेले शोभिनव सत्या आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी नीम करौली बाबांच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी शोभिनव सत्या यांना केवळ 15 लाख रुपये मानधन मिळाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते तेच आहेत.
शोभिनव सत्या यांना अचानक मिळाली भूमिका
म्हणतात ना, नशीबाची दारं उघडली की संधी कधी आणि कुठून येईल सांगता येत नाही. शोभिनव सत्या यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. अलीकडेच ‘जागरण’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी सांगितलेलं की, शोभिनव सत्या या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हते. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असतानाच अचानक मुख्य अभिनेत्याची तब्येत बिघडली. त्यानंतर शोभिनव सत्या यांच्याकडे ही भूमिका आली आणि त्यांनी कोणतीही ऑडिशन न देता थेट नीम करौली बाबांची भूमिका साकारली. विशेष म्हणजे शोभिनव सत्या स्वतःही नीम करौली बाबांचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे या भूमिकेशी त्यांचं एक वेगळंच नातं असल्याचं सांगितलं जातं.
अभिनयात येण्यापूर्वी केली वेगवेगळी कामं
शोभिनव सत्या यांनी लखनऊच्या Opulent School of Acting मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं. शिक्षक-काउन्सेलर आणि मार्केटिंग हेड म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यानंतर त्यांनी पुण्यातील FTIIमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रवेश केला.आज ‘हनुमान अंश’मधील नीम करौली बाबांच्या भूमिकेमुळे शोभिनव सत्या यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.