Dwidwadash Drushti Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची विशेष स्थिती आणि आपापसांतील संबंधांचा विशेष प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. द्रिक पंचांगानुसार, 22 जुलै 2026 रोजी म्हणजेच आज ब्रह्मांडात एक खास आणि दुर्लभ असा द्विद्वादश दृष्टी योग निर्माण होणार आहे.हा शुभ योग बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह जो साहस, ऊर्जा आणि भूमीचा कारक मंगळ ग्रहाबरोबर याची विशेष स्थिती होणार आहे. पंचांगानुसार, जेव्हा बुध आणि मंगळ ग्रह एकमेकांच्या 30 डिग्रीवर स्थित असतात तेव्हा हा शक्तिशाली द्विद्वादश योग निर्माण होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह आणि मंगळ ग्रह हा दुर्लभ ग्रहांचा मेळ काही राशींच्या करिअर, व्यवसाय आणि धन-संपत्तीच्या बाबतीत फलदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा काही 4 राशींच्या जीवनात सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीचा स्वामी स्वत: मंगळ ग्रह आहे. बुध आणि मंगळ ग्रहाचा हा द्विद्वादश योग तुमच्या संपत्तीत भरभराट करुन देऊ शकतो. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ होईल. तसेच, पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि मंगळ ग्रहाच्या युतीने तुमच्यात चांगला आत्मविश्वास दिसून येईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग लाभदायी ठरणार आहे. या कालावधीत तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे सोर्स निर्माण होतील. तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली आणि प्रबळ होईल. तसेच, लहान मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आबहे. द्विद्वादश योग तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. अनेक नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तुम्हाला तुमच्या कामातून नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Shani Sade Sati 2026 : सावधान! पुढचे 6 महिने ‘या’ 3 राशींना सतर्कतेचा इशारा; साडेसातीचा असणार कडक परिणाम, नोकरीत…