Last Updated:
EPFO ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याज कोट्यवधी पीएफधारकांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले हे तुम्ही दोन मिनिटातं चेक करू शकता.
मुंबई : तुम्ही नोकरी करता आणि तुमच्या सॅलरीमधून दरमहा पीएफ कट होत असेल. तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी ठरलेलं 8.25% व्याज कोट्यवधी अकाउंटमध्ये जमा केलं आहे. खरंतर 15 जुलैपासून हे सुरू करण्यात आलंय. पण अजुनही तुमच्या अकाउंटमध्ये व्याज दिसत नसेल. तर घाबरण्याची गरज नाही. अनेकदा सर्व अकाउंटमध्ये अपडेट येण्यास थोडा वेळ लागू शकतो. व्याज सर्व एलिजिबल अकाउंट्समध्ये जमा होईल.
अनेक पीएफ मेंबर्सच्या मनात प्रश्न आहे की, ईपीएफओने पाठवलेलं व्याज चेक केलं जाऊ शकतं का. यासाठी अनेक पद्धती आहे. पण आज आपण अशी पद्धत जाणून घेणार आहोत. की दोन मिनिटांत तुमच्या बॅलेन्सची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
EPFO पासबुकने असं चेक करा PF बॅलेन्स
- PF बॅलेन्स पाहण्याची सर्वात सोपी पद्धत EPFO पासबुक आहे.
- यासाठी सर्वात आधी EPFO ज्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि Passbook च्या सेक्शनमध्ये लॉगिन करा.
- येथे तुम्ही तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरा.
- तुमचंय UAN आधारशी जोडलेलं असेल, तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेल्या OTP ने लॉगिन पूर्ण करा.
- लॉगिननंतर ‘View Passbook’ किंवा ‘Passbook Lite’ ऑप्शनवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला दरमहा जमा झालेली कर्मचारी आणि कंपनीची रक्कम, व्याज आणि एकूण PF बॅलेन्सची पूर्ण माहिती मिळेल.
- नुकतंच व्याज जमा झालं आहे आणि ते पासबुकमध्येही दिसेल.
- तुमच्या अकाउंटमध्ये शेवटचे योगदान कधी जमा झाले होते, हे तुम्ही या पासबुकवरूनही तपासू शकता.
तुम्ही वेबसाइटवर लॉगिन करू इच्छित नसाल. तर SMS च्या माध्यमातूनही PF बॅलेन्स चेक करू शकता. यासाठी तुमचं UAN अॅक्टिव्ह असायला हवं आणि KYC पूर्ण झाली पाहिजे. आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN लिहून 7738299899 वर SMS पाठवा. काही वेळानंतर तुमच्या मोबाईलवर PF बॅलेन्स आणि अखेरच्या योगदानाची माहिती येईल.
यासह UMANG अॅपच्या माध्यमातूनही PF शी संबंधित सर्व सेवांचा वापर केला जाऊ शकतो. अॅपमध्ये UAN शी लॉगिन केल्यानंतर तुमचं बॅलेन्स, पासबुक, क्लेम स्टेटस आणि पेन्शनशी संबंधित माहिती पाहू शकता. गरज पडल्यावर पासबुक डाउनलोडही केलं जाऊ शकतं.
अनेकदा व्याज जमा झाल्यानंतरही लगेच पासबुकमध्ये दिसत नाही. याचं कारण टेक्निकल अपडेट किंवा रेकॉर्ड अपडेट होण्यास लागणारा वेळ असू शकतो. अशावेळी टेन्शन घेण्याची गरज नाही. EPFO च्या नियमांनुसार, सर्व अकाउंटमध्ये पूर्ण व्याज दिलं जातं. मग ते काही दिवसांनंतर दिसू शकतं.
दीर्घकाळपर्यंत अपडेट आलं नाही, तर आधी तपासून घ्या की, तुमचं UAN अॅक्टिव्ह आहे. आधार, पॅन आणि बँक अकाउंट योग्य पद्धतीने लिंक आहे आणि केवायसी पूर्ण आहे. गरज पडल्यावर EPFO हेल्पलाइन किंवा जवळच्या EPFO ऑफिसमध्ये बोलू शकता. वेळोवेळी आपलं पासबुक चेक करत राहा. यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा रक्कम, व्याज आणि कोणत्याही प्रॉब्लमची माहिती वेळोवेळी मिळत राहील.
Mumbai,Maharashtra
EPFO Passbook: पीएफ जमा झाल्याचा मेसेज आला? तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले, 2 मिनिटांत करा चेक
