Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल


Eknath Shinde Health: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात (Thane Hospital) दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असून एकनाथ शिंदे यांनी प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. (Maharashtra Politics news)

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण आणि प्रचंड दगदग याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला आहे. यामुळे शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. काल ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या ते रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही विशेष काळजी करण्याचे कारण नाही, असे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे सेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार आणि मुंबईतील विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांना फोडून आपल्या शिवसेनेत दाखल करुन घेतले होते. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या आहेत. याशिवाय, या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे सतत कामात व्यग्र होते. याचाच परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शुभांगी पाटील यांना पक्षप्रवेश काल दुपारी चार वाजता नियोजित होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. अखेर शुक्रवारी रात्री 2 वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा ठाण्यात पक्षप्रवेश झाला . शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर  नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी 50 हजारांच्या जवळपास मतं घेतली होती.

आणखी वाचा

शिक्षक आमदाराचा शिंदेंच्या शिवसेनेत दोनवेळा प्रवेश?; जिल्ह्यात वेगळीच चर्चा, सोशल मीडियात व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *