Deool Band 2 Box Office Collection: महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणणारा ‘देऊळ बंद 2:आता परीक्षा देवाची’ (Deool Band 2)या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.चित्रपट प्रदर्शित होऊन आता आठ आठवडे होत आली आहेत, दरम्यान हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या आकड्याला हात लावण्यासाठी केवळ दोन पावलं मागे आहे. ‘चला पुढचे तीन दिवस जगभरातील मराठी प्रेक्षकांनी जोर लावा’ असं म्हणत लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाने आत्तापर्यंत केलेल्या कमाईचा आकडाच सांगितला. जगभरातील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेल्या महिन्याभरात 16 देशांमध्ये या चित्रपटाचे 165 शो लागले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी मराठी बांधव परदेशातही एकवटताना दिसत आहेत. अगदी महाराष्ट्रातील छोट्या छोट्या खेड्यांपासून जगभरातील 16 देशांमध्ये मराठी चित्रपटाची पताका झोकात फडकत आहे.
देऊळ बंद 2 चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 चित्रपटाने फक्त पाच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 90.50 कोटी रुपयांचा गल्ला केला. इतर देशांमध्ये 6.10 कोटी रुपये तर तंबू शोमधून 2.10 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे एकूण कमाईचा आकडा 98.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यासंदर्भातील एका पोस्टमधून ही माहिती दिली. 100 कोटींपासून आता फक्त दोनच पावलं उरली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या शुक्रवारी 3 कोटी मग 5 कोटी असा कमाईचा गिअर या चित्रपटाने पकडला. सहाव्या आठवड्यात झोकात एन्ट्री घेत शनिवारी 24 लाख रुपयांची कमाई केली. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटामध्ये स्नेहल तरडे,मोहन जोशी,अतुल कुडळे,प्रसाद ओक,मंगेश देसाई,ओम भुतकर,संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. केवळ भारतात नाही तर परदेशातही या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. अमेरिका जपान दुबई ऑस्ट्रेलिया पोर्तुगाल डेन्मार्क कॅनडा आणि सिंगापूर अशा विविध देशांमध्ये देऊळ बंद 2 सिनेमा धुमाकूळ घालताना दिसतोय.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष