Delhi Metro Stations : आजही दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंदच, कोर्ट काय घेणार निर्णय? आंदोलनाच्या.. – Marathi News | Against the backdrop of the protest at Jantar Mantar 16 metro stations in Delhi will remain closed today as well


दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. दुपारी 12.30 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलन चिघळताना दिसतंय. विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीत जमत आहेत. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद परिसरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आग्रही आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले. दिवसेंदिवस जंतर मंतर मैदानावर आंदोलकांची संख्या वाढत आहे. यादरम्यानच दिल्लीत मेट्रो बंद आहे.

आजही 16 मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला. हा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. तरी आजही मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील सूचना मिळेपर्यंत खालील मेट्रो स्थानके 24 जुलै 2026 लाही बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेट मार्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध राहील. खालील मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग, शिवाजी स्टेडियम झंडेवालन हे मेट्रो स्टेशन आजही बंद राहणार आहेत.

जंतर मंतरवर नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन आहे. मात्र, याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसताना दिसत आहे. मेट्रो स्टेशनचा मुद्दा कोर्टात पोहोचला. हेच नाही तर दिल्लीतील इंटरनेट सेवाही काल बंद करण्यात आली होती. या आंदोलनादरम्यानच काही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांना टार्गेट केले जात आहे. दगड आणि काचेच्या बॉटल्स पोलिसांवर फेकण्यात आल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *