Dada First Look Out: सौरव गांगुलीच्या फिल्मचं पोस्टर रिलीज, नेटकरी संतापले, म्हणाले, ‘बापरे हे काय? दादा एवढे वाईट दिवसही नाही आलेत…’


Dada First Look Out: भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket Team) सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुली यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारलं जाणार आहे. त्यांच्या ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ (Dada: The Sourav Ganguly Story) या बायोपिकचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. सिनेमाच्या ‘फर्स्ट-लूक’ पोस्टरमध्ये राजकुमार राव (Rajkummar Rao) मुख्य भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा 14 मे 2027 रोजी रिलीज केला जाणार आहे. पण, हे पोस्टर नेटकऱ्यांना फारसं आवडलेलं दिसत नाही. कारण, पोस्टर रिलीज होताच, यावरुन टीकेचा सूर आवळला गेल्याचं पाहायला मिळतंय.  

राजकुमार रावचा ‘फर्स्ट लूक’ (Dada: The Sourav Ganguly Story First Look)

‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये राजकुमार राव ‘लॉर्ड्स’च्या बाल्कनीत उभा असलेला दिसतोय. त्यानं निळ्या रंगाची क्रिकेटची टीम इंडियाची पँट घातली असून तो ‘टीम इंडिया’ची जर्सी हवेत फिरवताना दिसतोय. हे दृश्य 2002 मधील त्या ऐतिहासिक क्षणाचं चित्रण करतं, जेव्हा टीम इंडियानं ‘नेटवेस्ट ट्रॉफी’ जिंकल्यानंतर सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपली जर्सी काढून हवेत फिरवली होती. हा क्षण सौरव गांगुली यांच्या अख्ख्या करिअरमधला एका महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे.

पोस्टरवर सिनेमाला ‘दादा’ असं नाव देण्यात आलंय, त्यासोबत “त्याने केवळ खेळ खेळला नाही, तर तो बदलून टाकला..” (He didn’t just play the game; he changed it) ही टॅगलाईनही आहे. पोस्टर वर सिनेमा 14 मे 2027 रोजी थिएरर्समध्ये प्रदर्शित होणार असल्याचं नमूद करण्यात आलंय.

पोस्टर प्रदर्शित होताच सुरू झाली ट्रोलिंग (Dada: The Sourav Ganguly Story Poster Trolled)

राजकुमार रावच्या लूकबद्दल अनेक चाहते उत्साही दिसत असले, तरी सोशल मीडियावरील एका मोठ्या वर्गाला तो या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. एका युजरनं लिहिलंय की, “हा कसला जोक आहे? चॅटजीपीटीनं (ChatGPT) यापेक्षा चांगलं एडिटिंग केलं असतं…” दुसऱ्या एका युजरनं टिप्पणी केलीय की, “नाही मित्रा, ही भूमिका दुसऱ्या कोणालातरी मिळायला हवी होती, तुला नाही…” आणखी एका युजरनं म्हटलंय की, “हे फोटोशॉप केल्यासारखं वाटतं, हे खरोखरंच अधिकृत पोस्टर आहे का?” 

दरम्यान, एका युजरनं असंही म्हटलंय की, “राजकुमार राव आपल्या भूमिकांमध्ये वाईट नसतो, पण तो या भूमिकेसाठी अजिबात साजेसा वाटत नाही…” अनेक युजर्सनी तर हे पोस्टर मागे घेण्याची मागणी केलीय. त्यांच्या मते, ते पाहून असं वाटतंय की, जणू काही डिझायनरनं आदल्या रात्रीच फोटोशॉप शिकलं असावं. तरीही, अनेक चाहत्यांचं असं मत आहे की, केवळ एका पोस्टरवरून अभिनेत्याचं मूल्यमापन करणं घाईचं ठरेल. आता सर्वांचं लक्ष सिनेमाचा टीझर आणि राजकुमार रावचं ट्रान्सफॉर्मेशन याकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘रीलस्टार कलाकार नसतात…’; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *