‘रीलस्टार कलाकार नसतात…’; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं


Gargi Phule On Mahesh Mote Toll Plaza Viral Video: सध्याचं युग सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे, तर सोशल मीडियावर रिल स्टार्सची हवा आहे. काही दिवसांपूर्वी रिलस्टार महेश मोटेचा (ReelStar Mahesh Mote) टोल नाक्यावरचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालेला. पुणे-पंढरपूर महामार्गावरील (Pune-Pandharpur Highway) टोल नाक्यावर रील स्टार असलेल्या महेश मोटेनं मोठा हाय व्होल्टेज ड्रामा केलेला. आपण सर्वसामान्य माणूस नसून रिलस्टार आहोत, असं म्हणणाऱ्या या रिलस्टारनं टोल नाक्यावर हैदोस घातलेला. त्यानंतर रिलस्टार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्याबाबत मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेली. अशातच आता मराठी अभिनेत्री गार्गी फुले (Marathi Actress Gargi Phule) यांनी रिलस्टार्सवर मोठं भाष्य केलंय. रील स्टार हे अभिनेते नाहीत, असं ठाम मत गार्गी फुले (Gargi Phule) यांनी माडलं आहे. 

मराठी अभिनेत्री गार्गी फुले नेमकं काय म्हणाल्या? (Gargi Phule Reaction On Mahesh Mote)

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या की, “मी एक-दोन मुलाखतींमध्ये म्हणालीये की, रील स्टार हे कलाकार नाहीत. फॉलोअर्स बघून काही वाहिन्यांनी त्यांना कामंसुद्धा दिली. पण, ते कलाकार नाहीत, स्टार आहेत. यामुळे मी ट्रोलही झाले. खूप जण म्हणाले, आम्ही कंटेंट करतो, त्याची मेहनत नाहीये का? मी म्हणेन आहे तुमची मेहनत… पण, अभिनय हा मुद्दा जेव्हा येतो, तेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्री हा मुद्दा नाही येऊ शकत. कलाकारांची 10-10 वर्षांची मेहनत आहे. पण रील स्टार म्हणतो मी अभिनेता आहे, तर ते योग्य नाही…”

“तुम्ही रील स्टार आहात म्हणजे कोण आहात?” (Gargi Phule Reaction On Reel Stars)

गार्गी फुले पुढे बोलताना म्हणाल्या की, “एका रील स्टारचा टोलनाक्यावरील व्हिडीओ व्हायरल झालेला. माझं असं झालं की, तुम्ही रील स्टार आहात म्हणजे कोण आहात? तो सरकारचा नियम आहे, तुम्ही द्या ना. मला गंमत वाटली ते बघून. हे फुकट आहे म्हणून तुम्ही बघताय. त्यावर पैसे लावा, मग ते बघणं बंद होईल…” 

“एका रील स्टारचा सिनेमा आलेला आणि त्या सिनेमाला कुणीही गेलं नाही. तो सिनेमा विचित्र पद्धतीनं फ्लॉप झाला. आज ते फुकट आहे, म्हणून तुम्ही आहात. हे सर्कल आहे, कधी ना कधी ते बंद होईल. अभिनय असं आहे की, तुमचं वय 80 असेल किंवा तुम्ही पाच वर्षांचे जरी असाल तरी अभिनय कुठे जात नाही. ती शिकवलेली आणि शिकलेली कला आहे…”, असं गार्गी फुले म्हणाल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’ म्हणत संजय राऊतांना टोला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *