Cocktail 2 Review| शाहिद – कृती -रश्मिकाच्या त्रिकूटानं भल्याभल्यांना लावलं वेड; मनोरंजनाच्या नशेत बुडवून टाकेल ‘कॉकटेल 2’; का पहावा हा चित्रपट?



Cocktail 2 Review: ‘कॉकटेल 2 ‘ ची कथा कुणाल म्हणजेच शाहिद कपूर आणि दिया म्हणजे रश्मिका मंदाना त्यांच्या नात्याभोवती फिरते. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांच्या आयुष्यात एली येते. तिची भूमिका कृती सेननने साकारली आहे. आता या तिघांच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊ ना याचा अनुभव घ्यावा लागेल.  कॉकटेलची ही कथा तुम्हाला एक वेगळ्याच नशेत घेऊन जाईल. याचा पहिला भाग 2012मध्ये आला होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला होता. आता ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट आजच्या काळानुसार बनवण्यात आलाय आणि तो आपल्या जागी कमाल आहे. आपण थिएटरमध्ये ज्या-ज्या कारणांसाठी चित्रपट पाहायला जातो, ती सगळी कारणं हा चित्रपट पूर्ण करतो. चांगलं कथानक, रिलेटेबल प्रसंग, उत्तम स्टारकास्ट, अप्रतिम लोकेशन्स, उत्तम संगीत… आणखी काय हवं?

चित्रपट कसा आहे?

हा एक कमालीचा सुंदर चित्रपट आहे. चित्रपटात अनेक असे प्रसंग येतात हे आजचा पिढीला अधिक रिलेटेबल वाटतात. कदाचित असं काही तुमच्यासोबत घडलं नसेल, पण तुमच्या ओळखीच्या कोणासोबत नक्की घडलं असेल. तिन्ही कलाकार इतके छान दिसतात की स्क्रीनवरून नजरच हटत नाही. चित्रपट सुरुवातीपासूनच मुद्द्यावर येतो आणि कोणताही वेळ न दवडता कथा पुढे सरकते.  विशेष म्हणजे, शाहिद कृती आणि रश्मिका या तिघांची पडद्यावरील केमिस्ट्री ही चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे.  त्यांचे लूक, स्टाईल कॉस्च्यूम्स, स्क्रीन प्रेझेंट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कमाल आहे. गाणी येतात तेव्हा मूड आणखी फ्रेश होतो. अनेकांना वाटलं होतं की हा पहिल्या कॉकटेलसारखा नसेल किंवा त्याचा रिमेक का बनवला? असा प्रश्न पडेल पण, हा चित्रपट आजच्या काळानुसार तयार करण्यात आला आहे. पहिल्या भागाशी याची तुलना करणं चुकीचं ठरेल, कारण दोन्ही चित्रपट आपापल्या जागी वेगळे आणि कमाल आहेत. एकूणच, एक सुंदर आणि चांगला चित्रपट पाहायचा असेल तर कॉकटेल नक्की पाहा.

अभिनय कसाय? 

शाहिद कपूरने कमाल काम केलं आहे. या भूमिकेत तो अगदी परफेक्ट वाटतो. तो  प्रचंड हँडसम आणि क्यूट दिसतो. तो ज्या पद्धतीने प्रसंग हाताळतो, ते पाहून तुम्ही त्याच्यावर फिदा व्हाल. कृती सेनन अप्रतिम दिसते. तिला पाहून वाटतं इतकं सुंदर कुणी कसं दिसू शकतं? आपल्या लूकने आणि कमाल ड्रेसेसने ती तुम्हाला वेड लावते आणि त्यानंतर आपल्या दमदार अभिनयाने उरलेलं काम पूर्ण करते. रश्मिका या भूमिकेत फिट बसते. अनेकांना वाटलं होतं की ती कॉकटेलमध्ये काय करतेय, पण चित्रपट पाहिल्यावर ते समजतं. रश्मिकाचं काम बॅलन्स्ड आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हे तिघेही कलाकार इतके छान दिसतात की त्यांच्याकडून नजर हटत नाही.

लेखन आणि दिग्दर्शन

लव रंजन आणि तरुण जैन यांचं लेखन खूप रिलेटेबल आहे. आजच्या काळानुसार ते लिहिलं गेलं आहे आणि चित्रपटातील प्रसंगांशी तुम्ही सहज जोडले जाता. होमी अदजानियाचं दिग्दर्शन खूपच उत्तम आहे. तीन मोठ्या कलाकारांचा कसा वापर करायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

संगीत कसंय?

प्रीतमचं संगीत कमाल आहे. चित्रपटातील गाण्यांची नशा हळूहळू चढत जाते आणि ती ज्या सुंदरतेने चित्रित केली आहेत, त्यामुळे ती आणखी प्रभावी वाटतात. तुम्ही गाणी एन्जॉय करता, गाणं लागलं की फोन चेक करत नाही किंवा बाहेर जात नाही.एकूणच काय ?  तर हा एक सुंदर चित्रपट आहे, नक्की पाहायलाच हवा.

रेटिंग – 4 स्टार्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *