Bhumi Pednekar: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने दिल्ली- एनसीआरमध्ये (Delhi) चालत्या स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय तरुणीसोबत झालेल्या कथित अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या घटनेवर संताप तसेच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तिने या घटनेला लज्जास्पद असं म्हटलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल (Social Media) झाली आहे. दिल्लीच्या या घटनेनंतर सर्वत्र स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील लोकांना धक्का बसला आहे. अशा प्रकारचे प्रकरण आणखी किती दिवस सुरू राहणार? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. नेमकं प्रकरण काय? भूमी पेडणेकरची नेमकी पोस्ट काय? पाहूयात.
भूमी पेडणेकरने दिल्लीतील प्रकरणावर सोमवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन नाराजी व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत वारंवार चर्चा होऊनही अशा प्रकारच्या घटना का घडतात? असा सवाल अभिनेत्रीने यावेळी पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलाय. भूमी पेडणेकरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. भूमीने पोस्ट शेअर करत त्यावर लिहिलं की, ‘हे असं पुन्हा पुन्हा घडताना आपण कसं पाहू शकतो! हे लज्जास्पद आहे!’. भूमी पेडणेकरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नक्की प्रकरण काय?(Bhumi Pednekar Reacts To Alleged case Of Delhi Case)
दिल्लीतील धावत्या स्लीपरमध्ये ही संतापजनक घटना घडली. एका 16 वर्षीय तरुणीसोबत कथितरित्या सामुहिक अत्याचार झाला असल्याचं बोललं जात आहे. साधारण बस 43 किलोमीटरपर्यंत धावत होती. त्यानंतर त्या पीडित तरुणीला मध्येच सोडून देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 4 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या परी चौकातून बसमध्ये चढली होती. तिला सेक्टर 63 येथे उतरवले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, चालत्या स्लीपर बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिच्यावर कथितरित्या जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर तरुणीला दिल्लीतील काश्मीरी गेटवर सोडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी कश्मिरी गेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर काही तासांतच, कानपूरचे रहिवासी असलेले दोन आरोपी, बस चालक कुलदीप (39) आणि कंडक्टर संदीप (26) या दोघांनाही तिमारपूरमधील एका पार्किंग परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: