भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ठाणे : राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाईचा धडाका लावला असून शिपायापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये, अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आता, ठाणे एसीबीनेही अशीच धडाकेबाज कारवाई करत एका पोलीस हवालदारास रंगेहात अटक केली. भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि व्यवसायाला त्रास होऊ नये यासाठी 35 हजार रुपयांची…