Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…


Ashadhi Ekadashi 2026 : हिंदू धर्मानुसार, आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2026) म्हणजेच देवशयनी एकादशी ही फार महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. भागवत संप्रदायासाठी ही एकादशी म्हणजे एक मोठा भक्तीचा उत्सव असतो. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. भगवान विष्णू पुढच्या चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. म्हणूनच याला देवशयनी एकादशी म्हणतात. 

आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर काय करावे? 

  • शक्य असल्यास एकादशीचे व्रत किंवा उपवास करावा. 
  • भगवद्गगीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा हरिपाठाचे वाचन करावे. 
  • राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप करावा. 
  • मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. 
  • गरीब, गरजू किंवा भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करावे. 
  • या दिवशी विठ्ठलाचे केलेले नामस्मरण अत्यंत पुण्यकारक मानले जाते. 

आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर काय टाळावे? 

  • आषाढी एकादशीच्या दिवशी राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळावे. 
  • नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. 
  • व्यसन आणि तामसी पदार्थांचे सेवन टाळावे. 
  • शक्य असल्यास मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. 
  • दिवसभर शक्य तितका सात्विक विचार ठेवावा.
  • एकादशीच्या दिवशी जमिनीवर झोपा.
  • कोणावर टीका करू नये / खोटं बोलू नये.
  • दिवस रात्र देवाचा अखंड दिवा लावून ठेवा.
  • ॐ. नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा.
  • उपवास केल्याने 100 गायींना दान केल्याचं पुण्य मिळेल.

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त (Ashadhi Ekadashi Shubh Muhurta 2026)

एकादशी तिथी प्रारंभ – 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजून 15 वाजता सुरु झाला आहे. 

एकादशी तिथी समाप्ती – 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी संपणार आहे. 

आषाढी एकादशी पूजेची योग्य पद्धत 

आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने संपूर्ण दिवस उपवास पाळावा. भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करावी. 

आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व (Importance Of Ashadhi Ekadashi 2026)

हा दिवस भगवान श्रीविष्णू आणि श्रीविठ्ठलाला समर्पित आहे. वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. नामस्मरण, भक्ती आणि सेवेला या दिवशी विशेष महत्त्व आहे. श्रद्धेने केलेली पूजा मन:शांती आणि अध्यात्मिक समाधान देते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                      

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी वारीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा महासागर; मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पाहा PHOTOS



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *