ABMCM History: भारत-चीन , भारत-पाक युद्ध अन् ‘मराठी चित्रपट महामंडळ’ ची स्थापना, रंजक आहे इतिहास, कोण होते पहिले अध्यक्ष?


मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार असून, या पूर्वी मोठं आरोप प्रत्यारोपांचं नाट्य पाहायला मिळालं. माजी अध्यक्ष मेघराज भोसले, विजय पाटकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. तर अभिनेत्री नीलम शिर्के विरुद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर अशी निवडणूक होता होता राहिली.

गेल्या काही वर्षात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे त्यांच्या कार्यक्रमांसाठी, कलाकरांसाठीच्या योजनांपेत्रा वादामुळं आणि कटकारस्थानांमुळं जास्त चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. खरं तर या महामंडळाला सिनेविश्वातील दिग्गजांचा इतिहास आहे, असं असताना सध्या सुरू असलेलं नाट्य खेद वाटणारंच आहे.

‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ ची स्थापना केव्हा झाली?

मराठी चित्रपटसृष्टीला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी आणि कलाकार, तंत्रज्ञ तसेच निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शिखर संस्था म्हणजेच ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’.

सिनेक्षेत्रातील कलाकारांना, तंत्रज्ञांना एकत्र आणण्यासाठी एका अधिकृत आणि मजबूत संघटनेची गरज भासू लागली. याच गरजेतून जन्म झाला तो चित्रपट महामंडळाचा. आज या संस्थेतील सदस्यांना याचा विसर पडल्याचं चित्र आहे.

आपल्या देशाच्या तसंच राज्याच्या इतिसाहासोबतच आपल्या मराठी सिनेइंडस्ट्रीचा इतिहासही तितराच रंजक आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर चित्रपट उद्योगाची वाढ झपाट्यानं होत होती, पण या क्षेत्रातील समस्या, अडचणीही वाढत होत्या. कलाकारांच्या अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी मध्यवर्ती संस्था अस्तित्वात नव्हती.

Maharashtra TimesRohit Parshuram : ‘काल वाढदिवसाचा मेसेज, आज श्रद्धांजलीची पोस्ट’ आंबेनळी घाटात मृत्यू झालेल्या महेश पवारसाठी मराठी अभिनेत्याची भावुक पोस्ट
भारत-चीन युद्ध आणि त्यानंतरच्या भारत-पाक युद्धाच्या काळात सीमेवरील सैनिकांच्या मनोरंजनासाठी आणि मदतीसाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार एकत्र आले. या संकटकाळात एकत्र काम करताना चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना जाणीव झाली की, मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी एक कायमस्वरूपी हक्काची संघटना असायला हवी. याच उद्देशानं १९६४ मध्ये झालेल्या पहिल्या चित्रपट परिषदेत एका मध्यवर्ती संघटनेची संकल्पना मांडली गेली.

पुढं, अवघ्या दोन वर्षांत म्हणजेच ९ नोव्हेंबर १९६६ रोजी ‘मराठी चित्रपट महामंडळ‘ अधिकृतपणे अस्तित्वात आलं. २३ मार्च १९६७ रोजी या संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली होती.

या महामंडळाचे पहिले अध्यक्ष

व्ही. शांताराम हे या महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. तर उपाध्यक्षपदाची धुरा बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर आणि ग. दि. माडगुळकर यांसारख्या दिग्गजांनी सांभाळली होती.

Maharashtra TimesRanveer Singh visit Chamundeshwari Temple: बंदी घातल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला, ‘कांतारा’नक्कल प्रकरणात माफीही मागितली

कोल्हापूर हेच केंद्र
सिनेउद्योगासाठी आज मुंबई आणि पुणे ही दोन शहरं महत्त्वाची मानली जात असली तरी पूर्ण पूर्वी कोल्हापूर हेच महत्त्वाचं ठिकाण होतं. मराठी चित्रपटाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून या महामंडळाचा कारभार चाले.

व्ही. शांताराम यांच्यानंतर भालजी पेंढारकर, सुधीर फडके, राम कदम, आनंद माने, प्रभातकुमार, विलासराव सरपोतदार आणि अलीकडच्या काळात महेश कोठारे, विजय पाटकर अशा अनेक नामवंत कलावंतांनी अध्यक्षपद भूषवत महामंडळाचा गाडा पुढं हाकला आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *