Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; ‘बँक ऑफ बडोदा’ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर


Ayodhya Ram Mandir Donation Row : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावरून मोठी खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास करत असताना अयोध्या पोलिसांनी आता ‘बँक ऑफ बडोदा’च्या (Bank of Baroda) अयोध्या शाखेला कायदेशीर नोटीस बजावून कसून चौकशी केली आहे. 

या चौकशी दरम्यान बँक ऑफ बडोदामधील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खाते, त्यात जमा होणारी रक्कम आणि या प्रकरणातील मुख्य आरोपींचे बँक व्यवहार यांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदामध्ये ट्रस्टचे एक अधिकृत खाते आहे, त्यामध्ये भाविकांकडून येणारी केवळ ऑनलाइन देणगी जमा केली जाते. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या क्यूआर कोड (QR Code) द्वारे मिळणारे पैसेच थेट या खात्यात जमा होतात. या बँकेत कोणत्याही स्वरूपात रोख (Cash) व्यवहार होत नाहीत, तसेच बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा ट्रस्टमध्ये किंवा मंदिरात जमा होणारी रोकड मोजण्यात कोणताही सहभाग नाही.

Ram Mandir Trust Bank Accounts : राम मंदिराचा निधी कोणत्या बँकेत जमा?

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरात येणाऱ्या एकूण देणगीपैकी केवळ 10 ते 15 टक्के देणगी ही ऑनलाइन पद्धतीने बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेत (PNB) जमा होते. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व मोठी देणगी आणि रोख रक्कम ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये जमा केली जाते. एसबीआय हीच राम मंदिर ट्रस्टची मुख्य बँक असून, रोकड मोजण्यासाठी एसबीआयकडूनच आउटसोर्स कॅशियरची नियुक्ती केली जाते.

राम मंदिर ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ते थेट आज 2026 पर्यंत, मंदिरात दरमहा सरासरी एक ते दीड कोटी रुपयांची ऑनलाइन देणगी येते. महाकुंभ किंवा सुट्ट्यांच्या काळात हा आकडा दुप्पट होऊन 4 ते 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. 

ट्रस्टच्या वतीने वर्षातून केवळ एक-दोनदाच धनादेशाद्वारे (Cheque) पैसे काढले जातात. जेव्हा मोठी रक्कम काढायची असते, तेव्हा बँक ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी क्रॉस चेक करूनच धनादेश क्लिअर करण्यात येतो.

Champat Rai Anil Mishra Accounts : चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचेही बँक खाते

बँक ऑफ बडोदाच्या अयोध्या शाखेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचेही एक वैयक्तिक खाते आहे. हे खाते अनेक वर्षांपूर्वी दिल्लीहून अयोध्या शाखेत ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र, हे खाते सध्या फारसे ॲक्टिव्ह नसून त्यात खूपच कमी रक्कम शिल्लक आहे. तसेच ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांचेही या बँकेत खाते असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच एका ईव्ही गाडीसाठी या बँकेतून 20 लाख रुपयांचे वाहन कर्ज (Vehicle Loan) घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

Ram Mandir Corruption Case : आरोपींच्या खात्यांबाबत बँकेचा मोठा खुलासा

अयोध्या पोलिसांनी बँक ऑफ बडोदाला नोटीस पाठवून या प्रकरणातील एफआयआरमध्ये (FIR) नाव असलेल्या काही प्रमुख आरोपींच्या बँक खात्यांची सविस्तर माहिती मागवली होती. पोलिसांनी प्रामुख्याने खालील तीन व्यक्तींच्या खात्यांचे तपशील मागितले होते:

अविनाश शुक्ला (गुन्ह्यातील आरोपी)

मनिष यादव (टिन्नू यादवचा पुतण्या)

सुप्रिया मिश्रा (लवकुशची पत्नी, ही आरोपी नाही)

या नोटिशीला बँक ऑफ बडोदाने तातडीने लेखी उत्तर दिले आहे. बँकेने दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, त्यांच्या शाखेत आरोपी अविनाश शुक्ला आणि मनीष यादव या दोघांची बँक खाती आहेत. मात्र, सुप्रिया मिश्रा नावाच्या महिलेचे कोणतेही खाते या शाखेत अस्तित्वात नाही. 

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मनीष यादव याच्या बँक खात्यात सध्या अवघे 1400 रुपये शिल्लक असून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2026 या गेल्या काही महिन्यांत या खात्यातून एकही व्यवहार झालेला नाही. पोलीस आता या प्रकरणातील इतर बँकांच्या व्यवहारांचीही तपासणी करत आहेत.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *