AUSW vs WIW : ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत टॉस जिंकला, विंडीज विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण? – Marathi News | Womens t20i world cup aus vs wi 1st semi final australia won toss and elected bowling against west indies at kennington oval london


आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार आटोपलाय. एकूण 12 पैकी उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलंय. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 30 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन सोफी मॉलिनिक्स हीने फिल्डिंगचा निर्णय घेत विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता विंडीज 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वेस्ट इंडीज वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : कियाना जोसेफ, हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), स्टेफनी टेलर, डीएंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, जाझारा क्लॅक्सटन, जॅनिलिया ग्लासगो, आलिया ॲलेन, ॲफी फ्लेचर आणि करिश्मा रामहरक.

ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : जॉर्जिया व्होल, बेथ मुनी (विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, एश्ले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला कॅरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गार्थ आणि लुसी हॅमिल्टन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *