Home Minister Zee Marathi: आदेश भाऊजींची ‘ती’ हाक महाराष्ट्रभर ऐकू येणार? होम मिनिस्टर संदर्भात झी मराठीची मोठी हिंट


Home Minister Aadesh Bandekar: ‘ दार उघडपणे दार उघड ‘ अशी हाक ऐकवली की महाराष्ट्रातल्या तमाम महिला हातात रिमोट घेऊन टीव्हीसमोर बसायच्या. 2004 साली सुरू झालेला हा लोकप्रिय कार्यक्रम 2024 मध्ये थांबला . तब्बल 20 वर्ष प्रचंड लोकप्रिय ठरलेला हा रियालिटी शो आता लवकरच नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला घेण्याची चर्चा आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लाडके ‘आदेश भाऊजी ‘ आता पुन्हा ‘होम मिनिस्टर ‘ शो घेऊन छोट्या पडद्यावर येणार असल्याचे संकेत झी मराठीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पठारे यांनी एका कार्यक्रमात दिले. नुकत्याच पार पडलेल्या आंबा महोत्सवात त्यांनी याविषयी प्रेक्षकांना हिंट दिली.

होम मिनिस्टर कार्यक्रम पुन्हा सुरू होणार ?

होम मिनिस्टर हा कार्यक्रम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असल्याचं बोललं जातंय. हा शो पुन्हा एकदा अभिनेते, निर्माते, लेखक आदेश बांदेकर होस्ट करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका झी मराठी वाहिनी कडून जाहीर करण्यात आली नसली तरी अलीकडेच पार पडलेल्या अंबा महोत्सवा दरम्यान झी मराठी वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पठारे यांनी ‘दार उघड बये म्हणत भाऊजी येणार की आणखी कोणी ? ‘ असं म्हणत नव्या कार्यक्रमाचे संकेत दिले. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता नसल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

होम मिनिस्टर हा एक मराठी रियालिटी शो होता. या शोमध्ये सूत्रसंचालक व होस्ट आदेश बांदेकर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन महिलांच्या घरी भेट देतात. त्यांच्यासोबत विविध खेळ खेळतात. त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांची गप्पा मारतात. प्रत्येक भागाच्या शेवटी खेळात विजेत्या ठरलेल्या वहिनींना पैठणी मिळते.  या कार्यक्रमाची महाराष्ट्रभरात प्रचंड क्रेझ होती. 2024  मध्ये या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, या शोविषयी झी मराठी वाहिनीने महत्वाची हिंट दिलीय. त्यामुळे, आता आदेश भाऊजी पुन्हा छोट्या पडद्यावर मन जिंकायला येणार का याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान या विषयी वाहिनीने अधिकृत काहीही सांगितले नाहीय.

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *