Jasmin Bhasin Hospitalized: टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने (Actress) आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री बॉयफ्रेंड (Dubai) आणि काही खास मित्रांसह दुबईला गेली होती. पण अचानक तिची तब्येत बिघडली. तिला तातडीने दुबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर तिचा बॉयफ्रेंड अली गोनीने पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यानं गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गर्लफ्रेंडच्या आजाराबद्दल दु:ख व्यक्त केलं. दरम्यान, जस्मिन भसीनच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री दुबईहून भारतात परतली आहे.
जस्मिन भसीनची आता तब्येत कशी? (Jasmin Bhasin Hospitalized in Dubai return to India)
मिळालेल्या माहितीनुसार, जस्मिन भसीनला ‘टर्मिनल इलियटिस’ हा आजार झाला आहे. सोमवारी अभिनेत्रीने अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत अभिनेत्रीने सांगितलं की, तिला दुबईतील रुग्णालयातील डॉक्टरांनी तिथेच उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु, अभिनेत्रीने भारतात येण्याचा निर्णय घेतला. कारण तिला मायदेशातील डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे होते.
अभिनेत्री म्हणाली, ‘तुमच्यापैकी अनेकांना माझ्या तब्येतीबाबत जाणून घ्यायचे होते. तर, असं आहे की मला अजून मेडिकल क्लीयरेसं मिळालेलं नाही. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हिशोबाने मी ‘फिट टू फ्लाइट’ नाही. कारण मी अजूनही धोक्याबाहेर नाही. दुबईतील रुग्णालय, तेथील डॉक्टर्स , स्टाफ आणि एकूणच हेल्थ केअर फॅसिलीटी खूप चांगली आहे. मी खरंच सर्वांचे आभारी आहे. पण शेवटी घर हे घर असतं’.
‘डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलं आहे. माझी तब्येत आता स्थिर आहे. मी सध्या एअरपोर्टवर आहे. मी भारतात परतणार आहे. भारतात परतल्यानंतर मी पुन्हा उपचार सुरु ठेवेन’, असं टीव्ही अभिनेत्री आपल्या व्हिडीओत म्हणाली. वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री आजारी पडली होती. आता तिची तब्येत स्थिर असल्याचा मेसेज जस्मिनने आपल्या व्हिडीओतून चाहत्यांना दिला. जस्मिनची तब्येत बिघडल्यानंतर तिला तातडीने दुबईतील रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर तिचा बॉयफ्रेंड अली गोनीने पोस्ट शेअर केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा