Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या ‘बीबी-का-मकबरा’ (Bibi Ka Maqbara) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका विकृत प्रियकराने मकबऱ्याच्या आडोशाचा गैरफायदा घेत स्वतःच्याच प्रेयसीचा आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून शूट केला. पुढे तरुणीने त्याच्या धमक्यांना न जुमानता त्याच्याशी असलेला संपर्क तोडल्याचा राग मनात धरून, या नराधमाने तो खाजगी व्हिडिओ थेट तरुणीच्या सख्ख्या भावाच्या व्हॉट्सॲपवर पाठवला. या विकृत प्रकारानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रंजित राठोड (रा. धामणगाव, ता. खुलताबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी सागर राठोड यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ते दोघे बीबी-का-मकबरा परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी ऐतिहासिक वास्तूच्या आडोशाचा गैरफायदा घेत सागरने पीडितेच्या नकळत तिचा एक आक्षेपार्ह आणि खाजगी व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या जोरावर तो पीडितेला ब्लॅकमेल करत असावा, असा संशय आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, भावाच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवला
काही दिवसांनंतर तरुणीने सागरच्या छळाला कंटाळून आणि त्याच्या धमक्यांना न जुमानता त्याच्याशी असलेला सर्व संपर्क तोडला. याचाच तीव्र राग मनात धरून विकृत सागरने तिची बदनामी करण्याचे कारस्थान रचले. त्याने तो चोरून काढलेला आक्षेपार्ह व्हिडिओ थेट तरुणीच्या सख्ख्या भावाच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवून दिला. तरुणीने तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून या विकृत प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला आहे. पर्यटन स्थळांवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?