Cocktail 2 Box Office Collection Day 11: बॉलिवूड कलाकार शाहीद कपूर (Shahid Kapoor), कृति सेनन आणि रश्मिका मंदाना सध्या ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमातून कलाकारांची दमदार अॅक्टिंग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं. सैफ अली खानच्या’कॉकटेल’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘कॉकटेल 2’लाही प्रेक्षकांकडून (Box Office Collection) जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) करण्यात यशस्वी ठरला असून, सोमवारीही या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. हा सिनेमा रिलीज होऊम 11 दिवस पूर्ण झाले असून, सोमवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.
19 जून 2026 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. ‘कॉकटेल’ या सिनेमानंतर ‘कॉकटेल 2’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अलिकडेच या सिनेमाला टक्कर देण्यासाठी ‘कॉकटेल 2’ अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘कॉकटेल 2’ या सिनेमाला अक्षय कुमारच्या सिनेमानं जबरदस्त टक्कर दिली आहे. ‘वेलकम टू द जंगल’मुळे ‘कॉकटेल 2’ या सिनेमाचं कलेक्शनचं गणित थोडं बिघडू शकतं.
‘कॉकटेल 2’नं सोमवारी किती कोटींचे कलेक्शन केले? (Cocktail 2 Box Office Collection)
प्रेक्षकांसह समीक्षकांनीही ‘कॉकटेल 2’ या सिनेमाला उत्तम रिव्ह्यू दिले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘कॉकटेल 2’ या दोन्ही सिनेमांमध्ये टफ फाईट पाहायला मिळत आहे. ‘कॉकटेल 2’ या सिनेमानं पहिल्या दिवशी 13.50 कोटींचे कलेक्शन केले होते. आता सोमवारी या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले, याची आकडेवारी आता समोर आली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, फिल्म प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी या सिनेमानं 1.75 कोटींचे कलेक्शन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात ‘कॉकटेल 2’ या सिनेमानं आतापर्यंत 84.90 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा आकडा पार करेल, यात शंका नाही. ‘कॉकटेल 2’ या सिनेमाची सध्या ‘ये जवानी हैं दिवानी’, ‘पेद्दी’, ‘बंदर’, ‘भारत भाग्य विधाता’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ या सिनेमांशी टक्कर आहे. तरीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा