Mukesh Khanna Reacted On Ayodhya Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) एसआयटी (SIT) तपासात एक मोठा खुलासा झाला असून, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) पर्दाफाश झालाय. यामुळे अख्ख्या देशात खळबळ माजली आहे. तसेच, देशातील प्रत्येकालाच धक्का बसला आहे. मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या घोटाळा प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराशी (Ram Mandir) देशभरातील लोकांच्या भावना जोडल्या आहेत, त्यामुळे मंदिरातील देणगी घोटाळा म्हणजे, थेट लोकांच्या भावनांसोबत खेळलं जातंय, असं म्हटलं जातंय. हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचलेलं, पण या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी करण्यास नकार दिला. उत्तर प्रदेश सरकार (Government of Uttar Pradesh) आणि पंतप्रधान कार्यालय (PMO) यांनी तातडीनं कारवाई सुरू केलीय. ‘शक्तीमान’ (Shaktimaan) फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीही या वादावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, जनतेला एक महत्त्वाचं आवाहन केलंय.
अभिनेते मुकेश खन्ना नेमकं काय म्हणाले? (Mukesh Khanna On Ayodhya Ram Mandir Donation)
‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी राम मंदिर घोटाळ्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केलीय. त्यात त्यांनी लिहिलंय की, “तुम्हाला माहीत आहे का? मंदिरांमध्ये तुम्ही दिलेली रोख देणगी देवापर्यंत पोहोचतच नाही. ती मध्येच कुठेतरी गायब होते. सगळीकडे लुटमार सुरूये. ‘लूट सको तो लूट लो’ अशी एक म्हण आहे आणि लुटणारे लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मी एकदा म्हटलेलं, ‘भरे पड़े हैं चोर, डाकू और बेईमान, फिर भी मेरा देश है महान’… पण देणगी लुटणाऱ्या या लोकांना मी कोणतं नाव देऊ? चोर, डाकू की बेईमान? यापैकी काहीच नाही, कारण हे लोक या सगळ्याच्या पलीकडचे आहेत…”
पुढे बोलताना मुकेश खन्ना म्हणाले आहेत की, “हे फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटत आहेत. मी भक्तांना एवढाच सल्ला देईन की, तुम्ही देणगी देणं बंद केलं, तर घोटाळाही होणार नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये देणगी, खासकरून पैसे आणि दागिने अर्पण करणं बंद करा. यातच देवाला आनंद होईल…”, असंही मुकेश यांनी पुढे म्हटलंय.
अयोध्येतील राम मंदिरात देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी (Theft Of Donations And Offered Items At Ram Mandir In Ayodhya)
अयोध्येतील भव्य राम जन्मभूमी मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंच्या चोरीचं एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय, ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. नियमित ऑडिट या आर्थिक अनियमिततेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं (SIT) मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांना राजीनामा द्यावा लागलाय, तर आठ आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय.
प्रकरण नेमकं काय? (Ayodhya Ram Mandir Donation Scam)
नियमित ऑडिटदरम्यान, दानपेटीतून जमा झालेली रक्कम आणि बँकेत भरलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळल्यानं हा मोठा घोटाळा उघडकीस आला. तपासातून असं निष्पन्न झालंय की, मंदिरातील कर्मचारी, रोख रक्कम स्वीकारणारे कॅश काउंटरवरील कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांनी संगनमत करून देणगी स्वरूपात मिळालेली रोख रक्कम, दागिने आणि चांदीच्या वस्तू यांचा पद्धतशीरपणे अपहार केलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा