Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला तब्बल 50 धावांनी धूळ चारली. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑरेंज आर्मीने 255 धावा केल्या. 256 धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीला फक्त 200 धावाच करता आल्या. या पराभवानंतरही आरसीबीने प्लेऑफमधील टॉप-2 स्थान निश्चित केले असून आता क्वालिफायर-1 मध्ये त्याचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.
या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांचे प्रत्येकी 18 गुण झाले आहेत. . हैदराबादने 256 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्यामुळे आपला नेट रन रेट सुधारण्यासाठी आणि अव्वल 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना किमान 91 धावांनी जिंकणे आवश्यक होते. पण, हे शक्य झाले नाही. त्यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात 26 मे रोजी धर्मशाळामध्ये क्वालिफायर-1 खेळला जाईल, तर एसआरएचला एलिमिनेटर खेळावा लागेल.
255 on the board and the bowlers made sure it was never, ever in doubt 🔥#SRH cap off the league stage with a massive 5️⃣5️⃣-run win 🧡
Scorecard ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB | @SunRisers pic.twitter.com/LiQBSJDDR2
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026
अभिषेक आणि हेडची स्फोटक सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्याच षटकापासून डावाला सुरुवात केली. रसिक सलामने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रॅव्हिसला (26) बाद केले. त्याने यापूर्वी त्याच षटकात तीन चौकार मारले होते. अभिषेक शर्माने 52 धावा केल्या. जेव्हा तो बाद झाला, तेव्हा हैदराबादने 8.2 षटकांत 97 धावा केल्या होत्या.
ईशान आणि क्लासेनची दमदार भागीदारी
ईशान किशनने मधल्या फळीचे नेतृत्व केले, त्याला हेनरिक क्लासेनने साथ दिली. ईशानने सावकाश सुरुवात केली, पण 10 चेंडू खेळल्यानंतर त्याने आपल्या खेळीला गती दिली. हेनरिक क्लासेनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने 24 चेंडूंमध्ये 51 धावा करून आपला डाव पूर्ण केला. तिसऱ्या विकेटसाठीच्या 113 धावांच्या भागीदारीने आरसीबीला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. क्लासेन बाद झाल्यानंतरही आरसीबीला कोणताही दिलासा मिळाला नाही, कारण नितीश कुमार रेड्डीने 12 चेंडूंमध्ये 29 धावांचे योगदान दिले. ईशान किशन डावाच्या शेवटच्या चेंडूवर 79 धावांवर बाद झाला. बंगळूरच्या सर्व गोलंदाजांनी 12 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. रसिक सलामने दोन बळी घेतले, तर सुयश आणि कृणालने प्रत्येकी एक बळी घेतला.
व्यंकटेश अय्यरने धमाकेदार सुरुवात, पण…
आरसीबीच्या 256 धावांच्या पाठलागाची सुरुवात दमदार झाली. व्यंकटेश अय्यरने 17 चेंडूंमध्ये 44 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव अडखळला. विराट कोहली 11 चेंडूंमध्ये 15 धावांचे योगदान देऊन बाद झाला, तर देवदत्त पडिक्कलने 21 धावा केल्या. सतत विकेट पडत असताना, कर्णधार रजत पाटीदारने संयमाने खेळ करत आरसीबीला १६६ धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. त्याने 39 चेंडूंमध्ये 56 धावा केल्या. कृणाल पांड्यानेही 41 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली.
आणखी वाचा