ही अभिनेत्री तब्बल 20 वेळा सलमानच्या हातावर थुंकली; तरीही भाईजान…, नेमकं काय घडलं? – Marathi News | Co star Manoj Bakshi shared an anecdote about how child artist Harshaali Malhotra spat on Salman Khans hand twenty times during the filming of the movie Bajrangi Bhaijaan


अभिनेता सलमान खानचा बॉलिवूडमध्ये प्रचंड दबदबा आहे. मात्र तरी देखील तो डाऊन टू अर्थ असल्याचं पहायला मिळतंय. अनेकदा त्याने आपल्या कृतीमधून ते सिद्ध देखील केलं आहे. गरजू व्यक्तीला मदत लागली तर सलमान खान मदतीसाठी लगेचच हजर असतो. एवढी प्रसिद्धी मिळून देखील सलमान खान हा किती डाऊन टू अर्थ आहे, याचं एक उदाहारण सलमान खानसोबत ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात काम केलेले सहकलाकार मनोज बक्शी यांनी नुकतंच दिलं आहे. 2015 साली ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा नुकताच मनोज बक्शी यांनी शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून अनेकांनी सलमान खानचं कौतुक केलं आहे.

शुटिंगवेळी नेमकं काय घडलं?

या चित्रपटात हर्षाली मल्होत्रा या बालकलाकाराने मुन्नीची भूमिका साकारली होती, या चित्रपटातील किस्सा सांगताना मनोज बक्शी यांनी म्हटलं की संपूर्ण चित्रिकरणादरम्यान सलमान खानने कोणताही त्रागा न करता अतिशय चांगल्या पद्धतीने हर्षाली मल्होत्राला समजून घेतलं, तसेच खूप खेळीमेळीच्या वातावरणात या चित्रपटाचं शुटिंग पार पडलं.यावेळी मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा तब्बल वीस वेळा सलमान खानच्या हातावर थुंकली, परंतु सलमान खानने प्रत्येकवेळी आपला हात पुढे केला. तेव्हाच मला सलमान खान किती साधा आणि रियल माणूस आहे, हे कळालं, असं बक्शी यांनी म्हटलं आहे.

हर्षाली सलमान खानच्या हातावर का थुंकली?

या चित्रपटात एक सीन आहे, जेव्हा मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्रा ही पाकिस्तानमधून भारतात येते, आणि तिला तिथे नॉनव्हेज दिसतं. ती नॉनव्हेजकडे आकर्षित होते. परंतु तिला ते खूप जोरजोरात चावून आणि पटापट खायचं होतं असा तो सीन होता. मात्र ते तिला पटापट खाता येत नव्हतं. तिच्या तोंडामध्ये ते अडकलं जायचं, अशावेळी सीन सोडून तिला ते थुंकण्यासाठी बाहेर जावं लागतं होतं. तसं होऊ नये, म्हणून सलमान खानने आपला हातच तिच्या पुढे केला, ती तब्बल 20 वेळा त्याच्या हातावर थुंकली असं मनोज बक्शी यांनी म्हटलं आहे. ‘द वी टी शो’नावाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना बक्शी यांनी हा किस्सा सांगितला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *