काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी ‘ती’ ढाल बनली, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, FIFA सुरु असताना खेळाडूवर दु:खाचा डोंगर | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

व्हेनेझुएलाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू हेक्टर बेलो याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचं झालं असं की व्हेनेझुएलामध्ये एकामागोमाग एक भुकंपाचे धक्के बसले होते. या धक्क्यात हेक्टर बेलो याची बायको आणि एक वर्षाची चिमुरडी सापडली होती.

Venezuela Footballer Hector Bello wife andrea dies
Venezuela Footballer Hector Bello wife andrea dies

Venezuelan Football Hector Bello wife Death : फिफा वर्ल्ड कप सुरु असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हेनेझुएलाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू हेक्टर बेलो याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचं झालं असं की व्हेनेझुएलामध्ये एकामागोमाग एक भुकंपाचे धक्के बसले होते. या धक्क्यात हेक्टर बेलो याची बायको आणि एक वर्षाची चिमुरडी सापडली होती.यावेळी हेक्टर बेलोच्या बायकोने आपल्या स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन चिमुरडीला वाचवलं आहे. या घटनेने संपूर्ण फुटबॉल विश्व हादरलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

व्हेनेझुएलाचे फुटबॉलपटू हेक्टर बेलो यांनी या आठवड्यातील विनाशकारी भूकंपात आपल्या पत्नीला गमावले.त्याची पत्नी अँड्रिया बेलो यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या एक वर्षाच्या मुलीचे अलानाचे रक्षण केले. हेक्टर बेलो यांनी आज इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहिली.

अमेरिकन मीडिया आउटलेट ‘पीपल’च्या वृत्तानुसार, फुटबॉलपटू हेक्टर बेलो यांनी शुक्रवारी, २६ जून रोजी आपल्या पत्नीच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत त्यांनी लिहिले, “आई, तू नेहमीच आमची आवडती हिरो राहशील. तू किती अद्भुत होतीस आणि तुझे तिच्यावर किती प्रेम होते, हे मी माझ्या मुलीला सांगेन, असे हेक्टर बेलो सांगतो.

“तू तुझ्या बाबांना पूर्वीसारखे कणखर आणि हसरे पाहू शकणार नाहीस, पण मी वचन देतो की मी ठीक राहीन आणि तुला जगातील सर्वात आनंदी मुलगी बनवेन,असे हेक्टर आपल्या मुलीला वचन देताना सांगतो आहे.तसेच “आता फक्त तू आणि मी आहोत, आणि तुझी आई स्वर्गातून आपल्यावर लक्ष ठेवून आहे.” मला माहित आहे की अँड्रिया मला धैर्य देईल

‘या सर्व दुःखात, मला माहित आहे की जर तिला माझ्याशी बोलायला एक मिनिट जरी मिळाला असता, तर तिने मला माझ्या जीवाची बाजी लावून तुझे रक्षण करायला सांगितले असते, जसे तिने केले होते,असे हेक्टरने शेवटी सांगितले.

‘कुआमान दे काम्पिओनेस’ या संस्थेनुसार, भूकंपानंतर जेव्हा मदत आणि बचाव कार्य सुरू झाले, तेव्हा अँड्रिया बेलो यांचा मृतदेह त्यांच्या कोसळलेल्या अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला आढळला. तपासात असे उघड झाले की, अँड्रियाने मृत्यूच्या शेवटच्या क्षणांमध्येही आपल्या मुलीला पूर्णपणे झाकून ठेवले होते. तिच्या आईच्या सर्वोच्च बलिदानामुळेच लहानगी अलाना ढिगाऱ्याखाली सुरक्षितपणे वाचू शकली.

या आठवड्याच्या सुरुवातीला व्हेनेझुएलावर कोसळलेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा किमान 1430 वर पोहोचला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपांच्या मालिकेनंतर विविध कुटुंबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, किमान 68,900 लोक अजूनही बेपत्ता आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी ‘ती’ ढाल बनली, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, FIFA सुरु असताना खेळाडूवर दु:खाचा डोंगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *