Uddhav Thackeray: हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ उद्धव ठाकरेंनी शिवराज मामांचा कसा ‘मामा’ केला ते नितीन गडकरीपर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येताच पंख छाटणीचा पटच उलघडला


Uddhav Thackeray: हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, हे ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे. जसं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह (मामा) बदलून टाकला मामा. त्याचं नामोनिशाण ठेवलं नाही, फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला लिया ऊपर, डाल दिया कोने में, जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत केला. फुटीर खासदार बंडू जाधव यांच्याविरोधात झालेल्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. परभणीचा इतिहास  शिवसेनेने ज्याला उमेदवार म्हणून उभे केले त्याला जनतेने नेहमी निवडून दिले. मागील वेळी खासदार निवडून आले ते मोदींच्या लाटेमुळे नव्हे, तर बाळासाहेबांच्या फोटोवर आणि मशालीवर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले होते. गद्दारी करून भाजपच्या पायाशी लीन होणे हा महाराष्ट्र धर्माचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी फुटीर बंडू जाधव यांच्यावर केला. 

गडकरींच्या निश्चयात इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं

उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस विमानात हतबल दिसत होते. आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसलेला माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापत आहेत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत, आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? नितीन गडकरींचे पंख असे कापले, असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निश्चयामध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं. पातळ करून टाकलं त्यांचं सगळं. कारण पंखच छाटलेत. उड उड उड उड उड, कसा उडणार? अशी विचारणा त्यांनी केली.

आमचं हिंदुत्व विरुद्ध ‘बाबर जनता पार्टी’

ठाकरे यांनी सांगितले की, ज्यांना परवडत नाही ना, ते गद्दारी करतात. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो, तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे.आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम, हे देणार आमचं हिंदुत्व आहे. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायची, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आलीय, ‘बाबर जनता पार्टी’ ही बाबराची औलाद असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. 

तर ते बाद झाले पाहिजेत

आत्मपरीक्षणवरून उद्धव ठाकरे यांनी सवाल केला. आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे, ममता बॅनर्जीपासून सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा टीकाकारांनी आमच्या पक्षफुटीची केस चार चार वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये अजून प्रलंबित आहे, का आत्मपरीक्षण केलंनाही? अशी विचारणा केली. जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाचा निर्णय घेतो, त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे. जनता, मतदार म्हणजे पक्ष असल्याचे ते म्हणाले. सुरुवात वरून व्हायला पाहिजे, लोकसभा अध्यक्षानी कायदा पाळला पाहिजे. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही., असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *