Sangli Crime News : पुण्यातील केतन अग्रवाल (Ketan Agrawal Pune Lohagadh Case) हत्या प्रकरण ताजे असतानाच सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा छातीवर बसून गळा घोटून खून (Sangli Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनावही पत्नीने रचला होता. प्रेमविवाह केल्यानंतर दोन मुले असताना पत्नीने हे कृत्य केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पती झोपेतच मृत्यू (Crime News) झाल्याचा बनाव देखील रचला होता, परंतु विश्रामबाग पोलिसांनी संशयावरून कसून तपास करत खुनाचा छडा लावलाय.
Sangli Crime News : …मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हणमंत सर्जे (वय 28, रा. पोळमळा, सांगली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी व प्रियकरास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा आनंद हणमंत सर्जे (वय 28) हा पत्नी आणि दोन मुलांसह पोळ मळ्यात राहत होता. गुरुवारी पहाटे त्यास पत्नी आणि मेहुण्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Sangli Crime News : मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे, संशय बळावल्याने अधिक तपास सुरू
दरम्यान, डॉक्टरांनी कळविताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसत होते. संशय बळावल्याने अधिक तपास सुरू केला. पत्नीकडे चौकशी केली असता, आनंद यांना मारहाण झाली होती. त्यानंतर घरी झोपल्यानंतर मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. परंतु तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. त्यावेळी खुनाचा उलगडा झाला.
Sangli Crime: पत्नीसह प्रियकरास ताब्यात घेतलं, खुन केल्याची कबुली
त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह प्रियकरास ताब्यात घेतले, त्यावेळी तिने खुनाची कबुली दिली. पती आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता. याच कारणातून पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिने प्रियकराला बोलावून घेतले. सर्जे याचे पाय ओढणीने बांधल्यानंतर दोघांनी छातीवर बसून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती विश्रामबाग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च