Last Updated:
सिया आणि केतन ३१ मे रोजी लोहगडावर फिरायले गेले होते. तिथेच सियाच्या डोक्यात केतनला दरीतून ढकलून अपघाताचा बनाव रचण्याची कल्पना आली. त्यानंतर तिने किल्ल्यावरील धोकादायक जागांचे लोकेशन्स चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवले.
पुणे : लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकरानेच हत्या केली. दोघांची पोलीस चौकशी सुरू आहेत. आता पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ केतनचा खून केला नाही, तर त्यासाठी इंटरनेटचा क्रूरपणे वापर केला होता. केतनला कोणत्या पद्धतीने ठार मारता येईल आणि लोहगड किल्ल्यावरून नेमक्या कोणत्या ठिकाणावरून दरीत ढकलल्यास तो ‘अपघात’ वाटेल, याची संपूर्ण माहिती या दोघांनी ‘गुगल’वर शोधली असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनने गुगलवर हत्येचे वेगवेगळे पर्याय शोधून काढले होते. केतनला कसं संपवायचं? खून करता येईल का, विषाचा पर्याय तसेच अपघातात मारण्याचाही विचार केला गेला होता. पोलीस कारवाईपासून कसे वाचायचे, याचाही त्यांनी इंटरनेटवर अभ्यास केला होता. गुगलवर ठिकाण निश्चित केल्यानंतर या दोघांनी केतनला धक्का देण्याचा प्रत्यक्ष सरावदेखील केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
सिया आणि केतन ३१ मे रोजी लोहगडावर फिरायले गेले होते. तिथेच सियाच्या डोक्यात केतनला दरीतून ढकलून अपघाताचा बनाव रचण्याची कल्पना आली. त्यानंतर तिने किल्ल्यावरील धोकादायक जागांचे लोकेशन्स चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवले. गुगलवरील माहिती आणि सरावानंतर त्यांनी १४ जून रोजी केतनला किल्ल्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला होता. मात्र, त्या वेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. अखेर १८ जून लोहगड किल्ल्यावरील ‘हत्ती तलावा’जवळील दरीत केतनला ढकलून त्याचा खून करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी दोघेही संभाषणानंतर आपले व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत असत.
गुन्ह्यादरम्यान पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चेतनने स्वतःचा फोन दुकानातच ठेवला होता आणि तो दुसऱ्याचा फोन घेऊन लोहगडावर पोहोचला होता. ओळख लपवण्यासाठी त्याने अंगावर हुडी घालून चेहरा झाकला होता. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याने हुडी काढून पिशवीत ठेवली, केतनचा खून केला आणि खाली उतरताना पुन्हा तीच हुडी परिधान करून तो पसार झाला. केतन दरीत कोसळताच सियाने आधी चेतनला तिथून सुखरूप रवाना केले आणि मग स्वतःच्या आईला फोन करून रडण्याचा बनाव सुरू केला.
या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेगाने चक्र फिरवली आहेत. शुक्रवारी सियाच्या भावाची तब्बल १० तास चौकशी केल्यानंतर, शनिवारी पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांचीही ५ तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली. सिया, चेतन आणि तिच्या कुटुंबीयांना या खूनी कटाची पूर्वकल्पना होती का, या दृष्टीने पोलीस सध्या तपास करत असून आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे.
Pune,Maharashtra
Ketan Agarwal : केतनला कसं संपवायचं? एक नाही, तर सिया-चेतनने अनेक दिवस केला अभ्यास; ‘गुगुल’वर सर्च केलेला हा भयंकर प्रश्न
