WT20 WC 2026 : भारतीय महिला संघ उपांत्य फेरी कसा गाठणार? फक्त तीनच शक्यता, अन्यथा आऊट – Marathi News | How can the Indian women’s team reach the semi finals WT20 WC 2026 Only three possibilities


WT20 WC 2026 : भारतीय महिला संघ उपांत्य फेरी कसा गाठणार? फक्त तीनच शक्यता, अन्यथा आऊटImage Credit source: BCCI Twitter

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो स्थितीसारखा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला तर आणि तरच उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असलं तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित तीन शक्यतेवर अवलंबून आहे. भारताला नशिबाची साथ मिळाली तर साखळी फेरीतील शेवटचा सामना गमवूनही भारतीय संघ उपांत्य फेरीत जागा पक्की करू शकतो. भारतीय महिला संघ ब गटात आहे. या गटात एकूण सहा संघ असून पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत.

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ब गटातून ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश हे संघ उपांत्य फेरीचं शर्यतीत आहे. त्यात बांगलादेशचं उपांत्य फेरी गाठणं खूपच कठीण आहे. शेवटचा सामना जिंकला तरी नेट रनरेटचं गणित काही सुटणार नाही. बांगलादेशचे 4 गुण असून नेट रनरेट हा -0.849 आहे. तर ऑस्ट्रेलियाने शेवटचा सामना गमावला तरी उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार हे कन्फर्म आहे. कारण ऑस्ट्रेलियाचे 8 गुण असून नेट रनरेट चांगला आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +4.724 आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दुसऱ्या जागेसाठी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे. दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना बांग्लादेश आणि भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

… तरच भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल

  1. ब गटात भारतीय संघ 6 गुण आणि +2.268 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण अफ्रिका 6 गुण आणि +0.734 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी शेवटचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण अफ्रिकेचे प्रत्येकी 8 गुण होतील. पण ऑस्ट्रेलिया आणि भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. कारण नेट रनरेट चांगला आहे.
  2. बांगलादेशने शेवटच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं. तसेच भारताचाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला तर तीन संघांचे समान गुण होतील. भारत, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांचे प्रत्येकी 6 गुण होतील. पण नेट रनरेटच्या जोरावर भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळू शकते.
  3. दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशविरुद्धचा सामना गमावला आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीत असतील. त्यामुळे या दोन सामन्यांच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *