फुटबॉलपटूची धाकधूक वाढली, व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपात पत्नी आणि मुलं बेपत्ता
Image Credit source: Instagram
Argentina footballer Lucas Trejo: व्हेनेझुएला येथे झालेल्या भूकंपामुळे अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लुकास ट्रेजो यांची धाकधूक वाढली आहे. कारण या विनाशकारी भूकंपात त्याचं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं आहे. 24 जून 2026 रोजी व्हेनेझुएलाच एकापाठोपाठ एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी होती. यातून सावरत नाही तोच 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपचा धक्का बसला. त्यावेळी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लुकास ट्रेजो कोपा व्हेनेझुएला स्पर्धेच्या तयारीसाठी काराकासमध्ये होता. त्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवले आणि इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. यावेळी एक बहुमजली इमारतही कोसळली त्यात लुकासचं कुटुंब राहात होतं. यात त्याची पत्नी आणि दोन मुलं होती. इमारत कोसळल्याने त्यांचं काय झालं असावं याची चिंता आात लुकास ट्रेजोला सतावत आहे.
फुटबॉलपटू लुकास ट्रेजो कुटुंब राहत असलेल्या ला ग्वायरा घराला या भूकंपाचा धक्का बसला आणि जमिनदोस्त झालं. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं काय झालं असेल याची चिंता त्याला सतावत आहे. घराची स्थिती पाहता कोण वाचलं असेल याबाबत कल्पना करणंही कठीण आहे. आपल्या कुटुंबाबाबत काहीच माहिती नसल्याने त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक आणि हताश करणारी पोस्ट टाकली आहे. त्याने जगभरातील चाहत्यांच्या भावनिक साद घातली आहे. जर कोणी ला ग्वायरा घराच्या आसपास असेल तर पत्नी यानिना मारानिला, मुलगा एरॉन आणि मुलगी ऐन्होआ यांच्या सुरक्षेची बातमी द्यावी. त्याची ही पोस्ट अर्जेंटीना आणि व्हेनेझुएलात व्हायरल झाली आहे.

लुकास ट्रेजो कोण आहे?
38 वर्षीय लुकास ट्रेजो व्हेनेझुएलाच्या सेगुंडा डिव्हिजन क्लब मारिटिमोसाठी डिफेंडर म्हणून खेळतो. व्हेनेझुएलाच्या मोनागास स्पोर्ट्स क्लबसाठीही खेळता आहे. यापूर्वी लुकास ट्रेजो युरोप, अमेरिका, कोलंबिया, पेरू आणि मेक्सिकोमधील क्लबसाठीही खेळला आहे.