Last Updated:
ग्रहांची युती मानवी जीवनावर आणि स्वभावावर खोलवर परिणाम करते. येत्या काही दिवसात एक अशी अशुभ युती तयार होणार आहे ज्याचा काही राशींच्या वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे.
Shukra-Ketu Yuti : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची युती मानवी जीवनावर आणि प्रामुख्याने मानवी स्वभावावर खोलवर परिणाम करत असते. 4 जुलैला सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक असलेला ‘शुक्र’ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत आधीपासूनच छाया ग्रह ‘केतू’ विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत ‘शुक्र-केतूची’ अत्यंत संवेदनशील युती निर्माण होणार असून ती 30 जुलैपर्यंत सक्रिय राहील. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि केतू यांच्यात तीव्र शत्रुत्वाचा भाव आहे. शुक्र हा प्रेम आणि भौतिक आकर्षणाचा प्रतीक आहे, तर केतू हा वैराग्य, भ्रमाचा कारक आहे. दोन टोकांचे ग्रह एकत्र आल्यामुळे नात्यांमधील गोडवा संपून विनाकारण गैरसमज आणि भावनिक अंतर वाढू शकते. या अशुभ युतीमुळे तीन राशींच्या लोकांना वैयक्तिक नात्यात आणि कौटुंबिक आयुष्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
या काळात शुक्र आणि केतूचा प्रभाव तुमच्या प्रेम जीवनावर पडेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, म्हणून प्रत्येक समस्या तुमच्या जोडीदाराशी थेट बोलूनच सोडवा. इतरांचा सल्ला घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात संयम बाळगणे महत्त्वाचे ठरेल. कमी बोला आणि आपल्या जोडीदाराचे लक्षपूर्वक ऐका, यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारू शकतात.
शुक्र आणि केतू तुमच्याच राशीत एकत्र येतील, ज्यामुळे तुमच्या स्वभावावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मनात गोंधळ आणि अस्थिरता जाणवू शकते, ज्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवरही होईल. तुमच्या जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. प्रेमसंबंधांमध्ये विनाकारण संशय किंवा टीका टाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा नाते कमकुवत होऊ शकते. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने घसा आणि पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
या युतीचा तुमच्या सातव्या घरावर परिणाम होईल, जे विवाह आणि भागीदारीचे घर मानले जाते. केतूच्या प्रभावामुळे तुमच्या मनात दुरावा किंवा उदासीनतेची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नात्यांमध्ये कोल्डनेस वाढू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून किंवा जोडीदारापासून भावनिक दुरावा निर्माण करू शकता, ज्यामुळे समोरची व्यक्ती गैरसमजाची बळी ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या वागणुकीकडे आणि शब्दांकडे विशेष लक्ष द्या. प्रेम जीवनात सुसंवाद टिकवण्यासाठी अहंकारापासून दूर राहा आणि आपले विचार जोडीदारावर लादणे टाळा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Mumbai,Maharashtra
