विलास घुले मृत्यू खून प्रकरण ! सौरव सोनवणेंची SIT कडून चार तास चौकशी, IPS व्यंकटराम यांनी दिली महत्वाची माहिती


Vilas Ghule death case :  हॉटेल चालक विलास घुले खून प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची एसआयटी कडून तब्बल चार तास चौकशी करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी सौरव सोनवणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. चार तास चौकशी करण्यात आल्यानंतर सौरव सोनवणे हे उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बाहेर पडले आहेत. या चौकशीनंतर एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांनी माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत या संदर्भातील माहिती पाहुयात. 

सौरव सोनवणेंनी आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली

विलास घुले खून प्रकरणी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची एसआयटी कडून चार तास चौकशी करण्यात आली. यानंतर एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुराव्याच्या आधारे संपूर्ण तपास सुरु आहे. हत्येसाठी वापरलेले साहित्य, चाकू सगळं जप्त केलं आहे. सौरव सोनवणे यांना आम्ही कालच हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती, यानंतर हजर झाले. आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली आहेत, त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. ते आम्हाला तपासात सहकार्य करत आहेत आमचा पुढील तपास सुरु आहे. थार गाडी तिथे गेल्याचे सांगत आहेत. त्या सर्व बाजुने तपास केला जात असल्याची माहिती एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांनी माध्यमांना दिली.  

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *