जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक पाठीशी आहे, तोपर्यंत शिवसेनेचा पाया हलवणे कोणालाही शक्य नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या राजकारणावर बोट ठेवत उद्धव ठाकरे म्हणाले की, “यांनी सध्या असा काळ निवडलाय, जिथे निवडणुका नाहीत. निवडणुका नसतानाही केवळ भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण या मागचा खरा हेतू वेगळाच आहे. यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलायचे आहे आणि म्हणूनच हे लोक लोकशाहीचा संकोच करत आहेत.”
