Welcome to the Jungle: बहुप्रतिक्षित ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) हा सिनेमा 26 जून 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी लिमिटेड पेड प्रीव्ह्यू (Paid Preview) शोज पार पडले. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून, हा चित्रपट कधी रिलीज होणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात होते. दरम्यान, सिनेमा प्रदर्शित (Akshay Kumar) होताच या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून कमालीचा रिस्पॉन्स मिळत आहे. पेड प्रीव्ह्यूमध्येही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमधून किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the Jungle box office collection)
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, अहमद खान दिग्दर्शित आणि अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू द जंगल’ हा कॉमेडी चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज झालाय. ‘वेलकम’ या सिनेमाच्या दोन्ही फ्रेंचायझीला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांकडून आजही आवर्जून पाहिले जातात. खदखदून हसवणाऱ्या या सिनेमाच्या तिसर्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. दरम्यान, आज हा सिनेमा रिलीज झाला असून, या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाच्या पेड प्रीव्ह्यूमधून या सिनेमानं 3.75 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, जवळपास 4.50 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. दरम्यान, पेड प्रीव्ह्यूमधून या सिनेमानं जबरदस्त कमाई केली आहे. आज हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवशी 17 ते 18 कोटी रुपयांची हा सिनेमा कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर आज या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर, याहून अधिक कोटी रुपयांची कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या हा सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा साधारण 250-300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. हा सिनेमा सर्वात महागडा कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानला जातो. आपला बजेट वसूल करण्यासाठी या सिनेमाला ओपनिंग डे, विकेंड आणि विकडेजमध्ये बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी हा सिनेमा नेमकं किती कोटींचे कलेक्शन करेल, ते उद्या रिपोर्टमधून समोर येईल.
अहमद खान दिग्दर्शित या सिनेमात 34 कलाकारांची मोठी टीम आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडीस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, राजपाल यादव हे कलाकार झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष