Gulabi Saadi: ‘मेरे संग फोटो तो..’ ”गुलाबी साडी’चा बॉलिवूड Version ऐकलंत का? रितेश देशमुखचा खास अंदाज, VIDEO


Gulabi Saadi Hindi Version: केवळ महाराष्ट्र नाही तर, भारत आणि परदेशात ‘गुलाबी साडी’ (Gulabi Saadi) या गाण्यानं सगळ्यांना भुरळ घातलीये.  या गाण्यानं संजू राठोडला नवीन ओळख मिळवून दिली. ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर (Entertainment) अनेकांनी व्हिडीओ तयार केले. विशेषत: महिला आणि तरुणींनी गुलाबी साडी नेसून, व्हिडीओ तयार केले, तसेच सोशल मीडियात धुमाकूळ घातला.  विशेष म्हणजे ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर देखील हे गाणं झळकलं. दरम्यान, गुलाबी साडी (Sanju Rathod) हे गाणं आता ‘धमाल 4’ या सिनेमातही झळकणार आहे.   या गाण्याला थोडा हटके हिंदी टच देण्यात आला आहे. या गाण्यात धमाल 4 ची कास्ट दिसत असून, रितेश देशमुखचा डान्स पाहायला मिळत आहे.  या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

‘गुलाबी साडी’ या गाण्याचं हिंदी व्हर्जन ऐकलंत का? (Gulabi Saadi Hindi Version Song)

‘धमाल 4’ या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या सिनेमात अजय देवगण  आणि इतर बॉलिवूड कलाकारांची मुख्य भूमिका आहे. रितेश देशमुखही या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकत आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘धमाल’ या सिनेमाच्या तिन्ही सिक्वेल्सना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता चौथ्या पार्टच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत.  

चौथ्या पार्टच्या ट्रेलरमध्ये कलाकारांची धमाल पाहायला मिळत आहे. तोच विनोद एक्स्ट्रा एन्टरटेंमेंटच्या तडक्यासह या सिनेमात आणखी काय पाहायला मिळणार? हे लवकरच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर समजेल. दरम्यान, महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख आणि अंजली आनंद  यांचा ‘गुलाबी साडी’ हे गाणं रिलीज झालं आहे. संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याला हटके बॉलिवूड टच देण्यात आला आहे. हिंदी व्हर्जनमध्ये हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. 

या गाण्यात अंजली आनंद हिनं गुलाबी साडी नेसलीये. तर, रितेश देशमुखनं पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. दोघांच्या हटक्या जोडीला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.   ‘गुलाबी साडी’ हे धमाकेदार गाणं   संजू राठोड याने गायलं असून, या गाण्याचे हिंदी बोल कुमार यांनी लिहिले आहे.  तर, प्रसिद्ध संगीतकार तनिष्क बागची यांच्यासोबत मिळून या गाण्याचे संगीत तयार करण्यात आलं आहे.  या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून,  उद्या म्हणजेच 27 तारखेला  हे गाणं रिलीज होणार आहे. दरम्यान, हा सिनेमा 10 जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहिद कपूरच्या ‘कॉकटेल 2’ची पहिल्याच आठवड्यात धडाकेबाज कमाई; 28 सिनेमांचे मोडले रेकॉर्ड, 100 कोटींचा टप्पा गाठणार?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *