Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Trust FIR : अयोध्या राम मंदिरातील दानातील चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. एसआयटीचा प्राथमिक तपास अहवाल मिळाल्यानंतर, रामजन्मभूमी (Ayodhya Ram Mandir) पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध नावे नमूद करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने एफआयआर दाखल केल्यानंतर, आठ जणांना आरोपी बनवण्यात आलंय. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एसआयटीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे ही तक्रार केलीय. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्वरित पावले उचलत 7 प्रमुख आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर अनुकल्प मिश्रा नावाच्या एका मुख्य आरोपीकडून कथित रक्कमेची वसुली झाल्यानंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाना साधत काही गंभीर आरोप केले आहे.(Ayodhya Ram Mandir Trust)
Sanjay Raut : आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आलीय..
‘अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे!’ असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मंदिराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Ayodhya Ram Mandir Trust FIR : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने एफआयआर दाखल केल्यानंतर, आठ जण आरोपी
राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य श्रीकृष्ण मोहन यांच्या तक्रारीच्या आधारे, राम मंदिरातील दानाच्या चोरीप्रकरणी टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, सुभाष चंद्र शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव आणि रामशंकर मिश्रा यांच्या विरोधात नावे नमूद करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३१६, ३१७, ३१७(४), ३१७(५), ६१, ३(५) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीसी कायदा) आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, देणगी चोरी प्रकरणी आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापैकी बहुतेक जण देणग्या मोजणे आणि आर्थिक व्यवहार सांभाळण्याच्या कामात गुंतलेले आहेत. हे आठ आरोपी कोण आहेत आणि राम मंदिरात त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या, हे आपण जाणून घेऊया.
रामाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव
या प्रकरणात नाव आलेली पहिली व्यक्ती रामाशंकर यादव आहे, जो टिन्नू यादव म्हणूनही ओळखला जातो. टिन्नू हा ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक असून तो त्यांच्या खूप जवळचा मानला जातो. दानपेटीची देखभाल करणे आणि तळघरात देणग्या पोहोचवण्याची जबाबदारी टिन्नूवर होती. असा आरोप आहे की टिन्नूने दानपेटीतून कोट्यवधी रुपये चोरले आणि स्वतःसाठी संपत्ती जमा केली.
लवकुश मिश्रा
दुसरा आरोपी लवकुश मिश्रा आहे. देणग्या आणि रोख रक्कम मोजण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी लवकुश मिश्रा एक होता. तपासादरम्यान, त्याच्या घरातून १२ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अनुकल्प मिश्रा
अनुकल्प मिश्रा देखील राम मंदिराच्या देणग्या मोजणाऱ्या टीमचा एक भाग होता आणि तो मोजणीच्या खोलीत पैसे मोजत असे. असा आरोप आहे की त्याने पैसे चोरून बाथरूममध्ये लपवले. त्यानेही कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली.
सुभाष चंद्र श्रीवास्तव
सुभाष चंद्र श्रीवास्तव हे राम मंदिराच्या रोकड मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमुख होते. त्यांच्यावर जाणीवपूर्वक देखरेखीकडे दुर्लक्ष केल्याचा आणि देणग्यांच्या चोरीत सामील असल्याचा आरोप आहे.
करुणेश पांडे
करुणेश पांडे मंदिरातील देणग्या मोजणीच्या खोलीत आणत असे आणि मोजणीत सहभागी होत असे. मंदिरातून चोरलेल्या पैशातून त्याने अयोध्या आणि आसपासच्या परिसरात जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.
मनीष यादव
मनीष यादव देखील राम मंदिराला मिळणाऱ्या देणग्या मोजण्याच्या कामात सहभागी होता. त्याच्यावरही देणग्यांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून ३६ लाख रुपये जप्त केले.
अविनाश शुक्ला
अविनाश शुक्ला देखील दानपेटीतून देणग्या मोजणीच्या खोलीत आणून त्या मोजण्यासाठी जबाबदार होता. त्याने मंदिराच्या निधीचा अपहारही केला.
रामाशंकर मिश्रा
दानपेटीतून देणग्या मोजणीच्या खोलीत आणणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही रामाशंकर मिश्रा यांच्यावर होती. त्यांनी पैसे चोरून स्वतःची मालमत्ता मिळवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?