Last Updated:
Ketan Agarwal Murder: पु्ण्यातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या आई आणि वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पुणे: उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या गाजत असलेल्या प्रकरणात त्यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत अनेक दाव्यांचे खंडन केले आहे.
वृत्तसंस्थेशी रुग्णालयातून बोलताना प्रवीण गोयल यांनी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच सिया आणि केतन यांचा उदयपूरमध्ये अत्यंत भव्य विवाहसोहळा आयोजित केला जाणार होता, अशा चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.
प्रवीण गोयल म्हणाले, विवाहासाठी कोणतेही विमान बुक केले नव्हते. उदयपूरमधील हॉटेल बुकिंगसह संपूर्ण लग्नाचा खर्च सुमारे 3 ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान झाला असता. त्यांनी लग्नासंदर्भातील विविध अफवांना आधार नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपी सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल म्हणाले, ज्याने कोणी हे कृत्य केले आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. ज्या किल्ल्यावरून आमचा केतन खाली पडला, तिथूनच जो कोणी दोषी आढळेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, त्याला तिथून खाली ढकलून दिले पाहिजे…
#WATCH | Pune, Maharashtra: Ketan Agarwal Murder Case | Pravin Goyal, father of accused Siya Goyal, says, “Whoever did this should receive the harshest punishment. Just like the fort from which our Ketan fell, whoever is found guilty, even if it’s my own daughter, should be… pic.twitter.com/V4ljVOXQBP
— ANI (@ANI) June 25, 2026
“आम्हाला सियाच्या प्रेमसंबंधांबद्दल आधी कोणतीही माहिती नव्हती. सिया एक साधी मुलगी होती. ती 19 वर्षांची आहे. एक 19 वर्षांची मुलगी असं काही करू शकते का? मला त्याच्याबद्दल (चेतनबद्दल) काहीच माहिती नाही. हा चेतन कुठून आला? मी कधी त्याचा चेहराही पाहिलेला नाही, ना मी कधी आयुष्यात त्याच्याशी बोललो आहे. तो कधीच आमच्या घरी आला नाही. केतनचे कुटुंबीय खूप चांगले आणि सुसंस्कृत लोक आहेत… आम्ही एक मुलगा आणि एक चांगलं नातं गमावलं आहे… आता तपास होईल. तपास होऊ द्या. माझी एवढीच इच्छा आहे की, जो काही निकाल समोर येईल त्यानुसार कारवाई व्हावी आणि दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे…”
केतन यांच्या मृत्यूबद्दल बोलताना प्रवीण गोयल भावूक झाले. ते म्हणाले, जे घडले ते अत्यंत दुःखद आहे. अजूनही आमचा त्यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या कुटुंबाने मुलगा गमावला आहे, पण तो आमचाही मुलगाच होता. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करत होतो.
ते पुढे म्हणाले, मला त्याच्याशी इतकी आपुलकी निर्माण झाली होती की तो आमचाच मुलगा असल्यासारखे वाटत होते. आम्ही एक प्रेमळ, हुशार आणि उज्ज्वल भविष्य असलेला मुलगा गमावला आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. आम्ही भविष्यासाठी अनेक चांगली स्वप्ने पाहिली होती.
प्रवीण गोयल यांनी असा दावाही केला की, सियाने कधीही केतनसोबतच्या विवाहाबाबत कोणतीही नाराजी किंवा अनिच्छा व्यक्त केली नव्हती. ते म्हणाले, लग्न ठरल्यानंतर ती नेहमी आनंदी होती. ती सतत केतनबद्दल बोलत असे. जर केतनच्या कुटुंबीयांनी आम्हाला अगदी थोडीशीही माहिती दिली असती की काहीतरी बिनसत आहे, तर आम्ही त्यांच्याशी नक्की चर्चा केली असती.
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आणि कठोर प्रतिक्रिया सियाची आई पूजा गोयल यांनी दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, न्यायालयात आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या मुलीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर ती दोषी असेल, तर तिला सर्वात कठोर शिक्षा द्या. ती दोषी ठरली तर तिला फाशी द्या. हे एका आईचे शब्द आहेत.
Pravin Goyal, Father of Siya Goyal is demanding Death sentence for those who murdered Ketan Agarwal including his own daughter Siya. Even in Raja Raghuvansi murder case, Family of Sonam made the same demand intially but..pic.twitter.com/s8OSQr9x6Y
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) June 25, 2026
काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली होती. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार या दोघांनी मिळून केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचला. 18 जून रोजी पुण्याजवळील लोहगड किल्ला येथे त्यांना दरीत ढकलून ठार मारल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणा विविध पुरावे, तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Mumbai,Maharashtra
Jun 25, 2026 11:50 PM IST
केतन खाली पडला तेथून आरोपीला खाली ढकलून दिले पाहिजे, सियाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया; आई म्हणाली, …तर तिला आताच फाशी द्या!
