Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; ‘या’ जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?


Gadchiroli News गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक तापाच्या उपचारासाठी अनेकदा पारंपरिक पुजाऱ्याकडे जातात. त्यामुळे उपचारास विलंब होतो आणि अनेकदा जीवही जातो. ही बाब लक्षात घेऊन तापाचा रुग्ण तात्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठविणाऱ्या पारंपरिक पुजाऱ्यांना प्रतिरुग्ण 200 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. रुग्णांमधील अंधश्रद्धेचा पडगा दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनाने ही तरतूद केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप पाहता कोणत्याही व्यक्तीस ताप असल्यास त्याची मलेरिया संशयित म्हणून 100 टक्के रक्त तपासणी करावी, इतर कारण निश्चित होईपर्यंत तापाच्या प्रत्येक रुग्णाकडे मलेरिया रुग्ण म्हणून पाहून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.

Gadchiroli News: गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात ‘वैद्य चिकित्सालय’; आरोग्य क्षेत्रात देशातील पहिलाच प्रयोग गडचिरोलीत

लोककथांमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे ग्रामीण भागात वैदू म्हणजे जादूटोणा, करणी, मंत्र-तंत्र करणारा व्यक्ती अशी प्रतिमा समोर येतो. मात्र हेच वैदु वनौषधींच्या आधारे पारंपरिक उपचारही करतात. अशाच ग्रामीण भागात कार्यरत वेदूंना आता एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. गडचिरोलीच्या ग्रामीण भागातील पारंपारिक वेदूंना एकत्र करत गोंडवाना विद्यापीठाने वैदू चिकित्सालय सुरू केले आहे. ज्या वैदूकडे उपचारासाठी लोक नकार देत होते. त्याच वैदूंकडे आता वनौषधी उपचारसाठी लोक गर्दी करीत आहेत. गडचिरोलीच्या वैदू चिकित्सा केंद्रात जवळपास 18 वैदु कार्यरत असून कमी दरात उपचारासाठी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे गोंड, माडिया आणि इतर आदिवासी समाजातील शेकडो वर्षांची वैदू परंपरा मुख्य प्रवाहात आली असून हे वैदु चिकित्सालय देशातील पहिलेच चिकित्सालय ठरले आहे.

Akola News : अकोल्यातील सिंधी कॅम्प भागात गुटख्याची खुल्या विक्री; अन्न आणि औषध पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

एकीकडे राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांनी काळाबाजार करणाऱ्यांना धडकी भरलीये. मात्र, अकोल्यातील सिंधी कॅम्प भागात अजूनही गुटख्याची खुलेआम विक्री सुरूये. यासंदर्भात माजी नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांनी एक स्टिंग ऑपरेशन करीत हा प्रकार उघडकीस आणलाय. अकोला हे पश्चिम विदर्भातील गुटख्याच्या काळाबाजाराचं केंद्र आहेय. अकोल्यातील गुटख्याचा काळाबाजार हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून होतोय. अकोल्यातील काश्मीर लॉज, एमआयडीसी आणि सिंधी कॅम्प या भागातून गुटख्याची मोठी तस्करी होतीये. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ याच रॅकेटच्या तस्करीवर शिक्कामोर्तब करणारा आहेय. अकोल्यातील गुटखा तस्करीच्या रॅकेटला ब देणाऱ्या अन्न आणि औषध पुरवठा विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींवर तुकाराम मुंढेंनी कारवाईची मागणी आता होताना दिसतेय.

इतर महत्वाच्या बातम्या 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *