MVA Meeting: पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी मुंबईत झालेल्या मविआच्या बैठकीला तब्बल 23आमदार गैरहजर होते. 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीचं (Mahavikas Agahdi) टेन्शन वाढले आहे. अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे. बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. अनुपस्थित 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं ‘एबीपी माझा’च्या हाती आली आहेत. त्या 16 जणांमध्ये काँग्रेसचे (Congress) सहा तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी पाच आमदार गैरहजर होते. एकूण 23 आमदारांनी मविआच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आता महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे. (Maharashtra Politics news)
जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आधी ही बैठक 23 तारखेला ठरली होती. मात्र, ती 24 तारखेला पुढे ढकलण्यात आली. दरम्यानच्या काळात मी दोन लग्नांना उपस्थिती लावणार असल्याचे कबूल केले होते. त्यावेळी पावसाळी अधिवेशन आणि बैठकीबाबत माझ्या लक्षात आले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तर विकास ठाकरे आणि सुनील राऊत यांनीही आपल्याला मतदारसंघात महत्त्वाची कामं असल्याचे सांगितले. आम्ही बैठकीला आलो नाही म्हणजे आम्ही फुटलो असा अर्थ निघत नाही, असेही या दोघांनी ठणकावून सांगितले.
MVA MLAs: बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
जयंत पाटील (शरद पवार गट)
नाना पटोले(काँग्रेस)
विजय वडेट्टीवार(काँग्रेस)
अमित देशमुख (काँग्रेस)
रोहित पवार (शरद पवार गट)
अस्लम शेख(काँग्रेस)
संदीप क्षीरसागर (शरद पवार गट)
सुनील राऊत(ठाकरे गट)
गजानन लवटे (ठाकरे गट)
बाबाजी काळे (ठाकरे गट)
राहुल पाटील (ठाकरे गट)
संजय दरेकर (ठाकरे गट)
विश्वजित कदम (काँग्रेस)
अभिजीत पाटील(शरद पवार गट)
विकास ठाकरे (काँग्रेस)
Uddhav Thackeray: बैठकीला आमदारांची दांडी, उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत का?’
मविआच्या या बैठकीला 23 आमदार गैरहजर राहिल्याची बाब उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी याबाबत तीव्र नाराजी बोलून दाखवली. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून आपण एकी दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलन सुद्धा एकत्रित करायला हवेत, आपली एकी राज्यभर दिसायला हवी. महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला.
आणखी वाचा
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!