थोडीतरी लाज बाळग, तुझ्या मुलाला काय तोंड दाखवणार? शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर आर. माधवनवर चिडले नेटकरी – Marathi News | R Madhavan gets brutally trolled for meeting Dharmendra Pradhan netizens slam him Have some shame NEET paper leak


मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी अभिनेता आर. माधवनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. आर. माधवनला भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या उत्कृष्ट आणि अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. मुख्य कार्यक्रमानंतर त्याने इतर मान्यवर आणि राजकीय व्यक्तींची भेट घेतली. त्यांच्यामेध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश होता. नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरातून धर्मेंद्र प्रधान यांच्यावर खूप टीका झाली होती. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात ते अपयशी ठरले होते. अशा व्यक्तीची भेट घेताना जराही लाज वाटली नाही का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी माधवनला ट्रोल केलंय.

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आर. माधवनसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो शेअर केला. त्यावर लिहिलं, ‘माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात आर. माधवन यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. मॅडीची प्रतिभा, नम्रता आणि उत्कृष्ट काम करण्याप्रती असलेली वचनबद्धता यामुळे त्यांनी अनेकांची प्रशंसा मिळवली आहे.’

धर्मेंद्र प्रधान यांनी पोस्ट केलेला फोटो-

हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप केला. ‘आपल्या पदाचा राजीनामा देण्याऐवजी ते अभिनेत्यासोबत निर्लज्जपणे पोझ देत आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला वाटतंय की ते त्याला एक चित्रपट बनवायला सांगत आहेत, ज्यात तो हे सिद्ध करेल की आयसिसने नीट पेपर सर्व्हर कसा हॅक केला आणि मग शौर्याने महान शिक्षण मंत्रालयााने इतिहासात पहिल्यांदाच नीट परीक्षा रद्द केली’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने राग व्यक्त केला. ‘हे सरकार स्वत:ला वाचवण्यासाठी माधवन आणि पंचायतमधल्या बिनोदसारख्या अभिनेत्यांची मदत घेत आहे. हे खूप खालच्या पातळीचं आहे’, असं आणखी एकाने लिहिलं.

आर. माधवनवर नाराजी व्यक्त करत काहींनी लिहिलं, ‘अभिनंदन माधवन. आता तू तुझ्या मुलाला काय तोंड दाखवणार? थ्री इडियट्ससारख्या चित्रपटात तू काम केलंस आणि आज तू अशा व्यक्तीला भेटलास, जे तरुणांची स्वप्नं चिरडून टाकत आहेत. तुला खरंच लाज वाटायला हवी’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नारीज व्यक्त केली.

नीट-यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आणि फेरपरीक्षेची घोषणा झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमधील 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीसह अनेक राज्यांमधील विद्यार्थ्यांनी प्रचंड शैक्षणिक दबाव, आर्थिक चिंता आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागणार या तीव्र भावनिक त्रासाने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *