ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार – Marathi News | Eng vs nz test series england against new zealand 3rd and final match live and digital streaming know all details


इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 24 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने करो या मरो स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पहिल्या पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिकेवर नाव कोरण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना 25 ते 29 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना नॉटिंगघममधील ट्रेंट ब्रिज इथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी साडे 3 वाजता सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन डकेट, एमिलिओ गे, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, शोएब बशीर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *