IPL : 12 कोटी कमी घेऊन पंत दिल्लीत, वैभवची किंमत 34 पटींनी वाढली, काय आहे रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यू? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

ऋषभ पंत आयपीएल 2026 नंतर पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. पंतची ट्रान्सफर ही फक्त एक साधी घटना नाही तर आयपीएलचं मार्केट आता स्वत:ला सुधारत आहे, याचे संकेत आहेत.

12 कोटी कमी घेऊन पंत दिल्लीत, वैभवची किंमत 34 पटींनी वाढली, काय आहे रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यू?
12 कोटी कमी घेऊन पंत दिल्लीत, वैभवची किंमत 34 पटींनी वाढली, काय आहे रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यू?

मुंबई : ऋषभ पंत आयपीएल 2026 नंतर पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. पंतची ट्रान्सफर ही फक्त एक साधी घटना नाही तर आयपीएलचं मार्केट आता स्वत:ला सुधारत आहे, याचे संकेत आहेत. आयपीएल 2025 च्या लिलावात लखनऊने पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात मोठी बोली होती. पण दोन सिझननंतर आता ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये 15 कोटी रुपयांमध्ये परत आला आहे.

भारतीय क्रिकेटमधल्या मोठ्या नावांपैकी एक असलेल्या पंतने 12 कोटी रुपयांची कपात स्वीकारली. पंतचं दिल्लीसोबत जुनं नातं आहे. दिल्लीसाठी पंत 9 मोसम खेळला, एवढंच नाही तर त्याने दिल्लीची कॅप्टन्सीही केली. 15 कोटी ही किंमत कमी नाही, पण 27 कोटींसोबत तुलना केली तर नक्कीच कमी आहे.

27 कोटींच्या पंतची रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यू 14.28 कोटी रुपये आली होती, म्हणजेच त्याला 12.72 कोटी रुपये ओव्हर पे करण्यात आले होते. या रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यूमुळेच पंत 15 कोटी रुपयांवर आला.

पंतची व्हॅल्यू का कमी झाली?

ऋषभ पंतच्या आयपीएल 2026 मधल्या कामगिरीमुळे त्याची व्हॅल्यू कमी झाली. त्याने 14 सामन्यांमध्ये फक्त 312 रन केले. पंतने या मोसमात 138.05 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 68 होता. सिझन इम्पॅक्ट चार्टमध्ये पंत 39व्या क्रमांकावर होता. पंतचा फायनल इम्पॅक्ट स्कोअर 905.33 आणि बॅटिंग स्कोअर 320.13 होता, हे आकडे फार वाईट नसले तरी त्याला मिळालेल्या किंमतीच्या तुलनेत निश्चितच वाईट ठरले.

वैभव सूर्यवंशीची व्हॅल्यू 34 पटींनी वाढली

वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने फक्त 1.10 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं, पण त्याने 16 सामन्यांमध्ये 48.50 ची सरासरी आणि 237.31 च्या स्ट्राईक रेटने 776 रन केले, यात एक शतक, 5 अर्धशतक, 63 फोर आणि 72 सिक्सचा समावेश होता. वैभवचा सर्वाधिक स्कोअर 103 रन होता.

वैभवने 63 फोर आणि 72 सिक्स मिळून 135 बाऊंड्री मारल्या. फक्त सिक्स मारूनच त्याने 432 रन केले. वैभवला राजस्थानने 1.10 कोटी रुपये दिले, पण सिझन संपल्यानंतर वैभवची रेटिंग ऍडजस्टेड व्हॅल्यू 34.97 कोटी रुपये आली, म्हणजेच राजस्थानला वैभवने 33.87 कोटी रुपयांचं सरप्लस दिलं.

वैभवचा फायनल इम्पॅक्ट स्कोअर 2490.35 आणि बॅटिंग स्कोअर 833.27 होता, तर पंतचा फायनल इम्पॅक्ट स्कोअर 905.33 आणि बॅटिंग स्कोअर 320.12 होता, म्हणजेच वैभवचा इम्पॅक्ट पंतपेक्षा 2.75 पट आणि बॅटिंग इम्पॅक्ट 2.60 पट जास्त होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *