Vidya Balan Reel On Onkar Bhojne Skit Reel: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या (Maharashtrachi Hasyajatra) शोचा महाराष्ट्रभर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ऑफिसमधून आल्यावर अनेक जण आवर्जून निखळ मनोरंजन करणारा हा कार्यक्रम पाहत असतात.पण तुम्हाला माहितीय, हास्यजत्रेच्या कॉमेडीचे अनेक बॉलीवूड कलाकारही फॅन आहेत. अशातच अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) हास्यजत्रेतील ओंकार भोजनेच्या एका गाजलेल्या डायलॉगवर रील बनवलाय. विद्या बालनच्या या धमाल रीलची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.अनेकांना विद्याचा हा व्हिडिओ प्रचंड आवडलाय. विद्या बालन अनेक वेळा कॉमेडी रील्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेक वेळा भाऊ कदम यांच्या कॉमेडी व्हिडिओजवरही रील्स बनवल्या आहेत.
ओंकार भोजनेच्या डायलॉगवर विद्या बालनची धम्माल रील
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका प्रहसनामधील अभिनेता ओंकार भोजनेच्या एका गाजलेल्या डायलॉगवर अभिनेत्री विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘एवढेच हवे आहे जगण्यासाठी ..हा हा हा हा ‘ असं कॅप्शन लिहीत तिने ही रील पोस्ट केली आहे. हिरील पाहताच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील अनेक कलाकारांनी या व्हिडिओवर खास कमेंट केल्या आहेत. नम्रता संभेरावने ‘Wohoo ‘ असं म्हणत विद्या बालनच्या रील वर हसण्याचे इमोजी टाकले आहेत. तर अभिनेत्री सई ताम्हणकरनेही ‘Yayyy mam’ अशी कमेंट करत विद्या बालनच्या रीलवर आपली पसंती दर्शवली आहे. प्रियदर्शनी इंदलकरनेही या रीलचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी असंख्य प्रतिक्रिया देत विद्या बालनचं कौतुक केलंय.
या रीलमध्ये विद्या ओंकार भोजनेच्या ‘अगं अगं आई ‘ या प्रहसनामधील डायलॉग बोलताना दिसते आहे. ‘काय लागतं जगण्यासाठी ?अन्न, वस्त्र, निवारा बस्स ..टीव्ही लागतो . बस्स ..इकडे तिकडे फिरायला बाईक लागते.बाईकमध्ये टाकायला पेट्रोल लागतं.रिचार्ज करायला पैसे लागतात.जेवायला चायनीज लागतं. बापरे! लई काय काय लागतंय !’ असं म्हणताना विद्याने चाहत्यांना खळखळून हसवलं आहे.
विद्या बालन मनोरंजनसृष्टीतील अतिशय तगडी कलाकार म्हणून ओळखली जाते. अतिशय गंभीर आणि आशयघन भूमिकांसह तिला कॉमेडी, ड्रामा अशा प्रकारचा कंटेंटही करायला आवडतो.तिच्या सोशल मीडियावर नकला करतानाचे अनेक व्हिडिओजला प्रेक्षकांची पसंती मिळते. हास्य जत्रेतील डायलॉग वर केलेल्या या रीलवर चाहत्यांसह सेलिब्रेटिंचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष